Just another WordPress site

कठोर कारवाई केवळ कागदावरच! साडेतीन वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला, अकोल्यातील घटना

अकोला : आईसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या साडेतीन वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला. यात गंभीर हा चिमुकला जखमी झाल्याने, त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर या चिमुकल्याचे प्राण वाचले. ही घटना अकोला शहरातील डाबकी रोडवरील आश्रय नगरात घडली आहे.

अकोला शहरातील डाबकी रोड वरील आश्रय नगरमध्ये राहणारा साडे तीन वर्षीय वीर प्रकाश उजाडे त्याच्या आईसोबत २६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास स्कुटीवरून जात होता. त्यांच्या स्कुटी समोरून कटलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा गेला. या नायलॉन मांजा मुळे अचानक चिमुकल्या वीरचा चार इंचापर्यंत गळा कापला गेलाय. वीर रक्ताच्या थारोळ्यात सापडला. घाबरलेल्या त्याच्या आईने तातडीने त्यास दवाखान्यात नेले, परंतु गंभीर स्थिती पाहता त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला.

त्यामुळे वीरला खाजगी रुग्णाला भरती करण्यात आले. त्याच्या गळ्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या दोन तास चाललेल्या शास्त्रक्रियेमुळे वीरचे प्राण बचावले. शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन माझ्या विक्री होत असल्याने लहान मुलांसह नागरिकांचं जखमी होण्याच्या प्रमाण आणि घटना वाढल्या आहेत.

दरम्यान, संक्रांत म्हटलं की एक नवा उत्साह संचारतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळपासच्या सर्व राज्यात पतंग उडविणे आणि त्याची मजा लुटण्याच्या बाबतीत अकोला जिल्हा देखील सुप्रसिद्ध आहे. आता संक्रात उत्सव जवळ येतोय. अनेक ठिकाणी पतंग उडवायला सुरुवात झालीये. मात्र पतंग उडत असताना नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे शहरात नागरिकांना चालताना किंवा वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्यूमुखी पडतात. मांजावर बंदी घालण्याची सूचना न्यायलयाने सरकारला केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी आहे. बंदी असूनही चिनी व नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!