Just another WordPress site

चोरट्यांची देवाच्या दारी चोरी, कराडमध्ये हनुमानाच्या मंदिरात चोरी, दानपेटी फोडून लाखांची रोकड लंपास

कराड : कराड तालुक्यातील पोतले येथील मारुती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडुन अंदाजे दीड लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीची माहिती समजताच कराड तालुका पोलिस मंदिरात पोहचले. चोरट्यांचा तपासासाठी पथक तयार केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली

पोतले येथे श्री स्वयंभू मारुती मंदिर आहे. या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. भाविक श्रद्धापुर्वक या मंदिरात आपआपल्या परीने दानधर्म करीत असतात. या मंदिरातील दानपेटी फोडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. ही चोरी पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या मंदिरातील दानपेटी पोतले ग्रामपंचायत कार्यालया शेजारील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बांधावर पडली होती. या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांची चाेरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, कोळे दूरक्षेत्राचे अमोल देशमुख, वेदपाठक, डीबीचे उत्तम कोळी, पोतले गावच्या पोलिस पाटील फरजाना मुल्ला हे पोहचले. या घटनेचा तपास करण्यासाठी पाेलीसांची पथकं तयार करण्यात आली आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!