Just another WordPress site

Sharad Mohol खून प्रकरणात गुंड विठ्ठल शेलारसह ११ जणांना अटक; गुन्हे शाखेची नवी मुंबई, मुळशीत कारवाई 

Sharad Mohol murder case : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने रविवारी रात्री नवी मुंबई परिसरात मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार (Vitthal Shelar) व रामदास मारणे (Ramdas Marane) यांच्यासह सात जणांना अटक केली. तसेच मुळशी परिसरातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

‘अर्बन’मधील इतर आरोपींवर काय कारवाई केली ? जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा सवाल 

शेलार हा मुळशीतील गुंड असून, तो भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचाही अध्यक्ष होता. त्याच्याकडे भोर वेल्हा व मुळशी तालुक्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर काही काळाने त्याला जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध जमीन बळकावणे, खुनीहल्ले व खंडण्या उकळण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याचे व गुंड मोहोळ याचे वर्चस्ववादातून वैमनस्य होते. त्यातून त्याच्यावर गेल्या वर्षी हल्ला करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने मोहोळ याचा खून घडवून आणला, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.

युतीधर्माचे पालन इमानेइतबारे करा, पोटे पाटलांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, बालकमंत्री म्हणणाऱ्यांचेही टोचले कान! 

मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ याचा ५ जानेवारीला कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता. खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत होते. मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्महाऊसवर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शेलार, मारणे यांच्यासह सात जणांना तेथून ताब्यात घेतले. त्यांच्या अन्य चार साथीदारांना मुळशी परिसरातून अटक करण्यात आली.

हत्या प्रकणाचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्यावा : हिंदुत्ववादी संघटनेची मागणी
पुणे : नवीन गोरक्षणाची चळवळ बळकटीकरणाचे काम करणारा शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र तपास यंत्रणेवर राजकीय दबाव वाढत असल्याने या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांची या विषयाची पत्रकार परिषद सोमवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात पार पडली. यावेळी त्यांनी पोलीस यंत्रणेच्या कामाबाबत एका बाजूला समाधानही व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा हत्या करण्यात आली होती.

या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास होऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी स्वतः मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. अतिरेकी संघटना व धर्मांध लोकांच्या अनेक गोष्टी मोहोळ यांनी उघडकीस आणल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा यानिमित्ताने करण्यात आला आहे. तर विदेशी बनावटीची पिस्तुल या हत्येसाठी वापरण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे. तर सकल हिंदू संघटनेच्या वतीने कोथरुडमध्ये किनारा हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यान २८ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!