Just another WordPress site

यवतमाळमध्ये दारु विक्रीच्या जुन्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा खून

यवतमाळ : दारु विक्रीच्या जुन्या वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. मित्रांनीच तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना यवतमाळ शहरातील पिंपळगाव मार्गावर असलेल्या एका डेरी परिसरातील शेतात घडली.

पंकज उर्फ लल्ला कोराळे (वय ३० वर्ष, रा. बांगर नगर, यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सनकी आणि त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे.

शहरातील पिंपळगाव मार्गावर पंकज उर्फ लल्ला कराळे याचे ‘लल्ला’ नावाने चिकन सेंटर आहे. याचबरोबर तो अवैधरित्या दारूचा व्यवसाय करीत होता. या अवैध दारू विक्रीच्या कारणावरून त्याचा पूर्वी मित्रांसोबत वाद झाला होता.

यावेळी वेळेनुसार दोघांमध्ये अवैध दारूचा विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. त्याचबरोबर अधूनमधून दोघांमध्ये खटके उडत होते. अशात सोमवारी सायंकाळी लल्ला याचे मित्र अप्सरा टॉकीज परिसरातील एका वाईन शॉपमधून विदेशी दारू घेऊन लल्ला याच्या दुकानासमोर आले. त्यानंतर लल्लाला घेऊन मित्र त्याच्या दुकानासमोर असलेल्या एका डेरी परिसरातील शेतात गेला.

यावेळी मित्रासह त्यांनी मद्यप्राशन केले. काही वेळातच लल्ला याच्यासोबत मित्रांनी वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात लल्लावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली.

घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर शहर आणि लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी नंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेचे गांभीर लक्षात घेता अप्पर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!