Just another WordPress site

व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केलं म्हणून अ‍ॅडमिनला बेदम मारहाण, संतापाच्या भरात अ‍ॅडमिनची जीभ कापली

पुणे : सोसायटीमध्ये वाद काही नवा नाही. पण सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीत हा प्रकार घडला आहे. या भागातील ओम हाईट्स या सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. हा प्रकार २८ नोव्हेंबर रोजी घडला आहे. सोसायटीत राहणाऱ्या एका रहिवाशाने ‘ओम हाईट्स ऑपरेशन’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये सोसायटीमधील सर्व सदस्य होते. या ग्रुपचा पीडित व्यक्ती अ‍ॅडमिन होता.

सोसायटीमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमधून काही जणांना रिमूव्ह केलं होतं. त्यामुळे तक्रारदार महिलेच्या पती आणि सोसायटीतील रहिवाशांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केली. मारहाणीत अ‍ॅडमिनची जीभ कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते जखमी झाले आहेत.

याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!