Just another WordPress site

अंगावर शहारा आणणारी घटना! भंडाऱ्यात पतीने बायकोचा गळा चिरून केली हत्या, अन् मग स्वत:लाही संपवलं

भंडारा : आर्थिक तंगीतून पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वत:चा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही सीतासावंगी इथं शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सरिता सुरेश बोरकर (३७) असं पत्नीचे तर सुशील नीलकंठ बोरकर (वय ४५) असं पतीचे नाव आहे. सुशील बोरकर हा अंडी विक्रीचा व्यवसाय करीत होता. तर सरिता ही आशा सेविका म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होती. काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्री सुशील आणि सरिता एका रूममध्ये तर दोन मुले दुसऱ्या खोलीत झोपी गेले होते. सकाळी साडे सहा वाजता मुले शाळेत जाण्याकरिता निघाली. आई दरवाजा उघडत नसल्याने मुलांनी शेजारी असलेल्या आपल्या काकाला आवाज दिला. काकाने मागील दरवाजा तोंडत आता प्रवेश केल्यावर सर्व घटना समोर आला आहे. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. त्यानंतर लगेच यांची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू केला असता आतून दार बंद असल्याने बाहेरून कुणी व्यक्ती खोलीत येण्याची शक्यता नव्हती. तसंच खोलीत एक ब्लेड आढळून आल्याने पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून सुशिलनेही त्याच ब्लेडने आपला गळा चिरुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुशीलचे ब्लेडने बोट चिरलेले आढळून आले याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!