Just another WordPress site

चाऱ्याचे भाव वधारले! मायबाप सरकार, जनावरे जगवायची तरी कशी? शेतकरी चिंतेत

महागाईच्या विळख्यात जसं जग सापडलं, तसाच भारतही सापडला. महागाईमुळे अनेक गोष्टी लोकांच्या अवाक्याबाहेर चालल्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य भरडले आहेतच, मात्र, याचा फटका पशुपालकांनाही मोठ्या प्रमाणात बसतोय. सर्वत्र महागाईचा डोंब उसळला असल्याने पशुखाद्य आणि चाराही महागल्यामुळे पशुपालक शेतकरी, तसेच दुग्ध व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले.

 

महत्वाच्या बाबी

१. कडबा पेंढीचा दर शेकडा १५००-१८०० इतका वधारला
२. महागाई, रोगराईचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय
३. जनावरे जगवावी तरी कशी, या विवंचनेत बळीराजा
४. चारा महागाईचा परिणाम आता दुधाच्या दरावरही होणार

 

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात पावसाने तुफान फटकेबाजी केली. या मुसळधार पावसामुळं विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये पिकांना मोठा तडाखा बसला. बऱ्याचे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने खरिपाची पिके धोक्‍यात आली होती. पावसाच्या या तडाख्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा पुरता कोलमडून गेला. तर काही भागात पिके माल धरण्याच्या अवस्थेत असतांना पावसाने ताण दिल्याने शेतकरी हवालहिल आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याच्या टंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आ वासून उभी राहिली. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपत आहेत. खरीब हंगाम पूर्णपणे वाया गेल्याचं चित्र आहे. अशाच चाऱ्याच्या किंमती वधारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. या चारा महागाईचा परिणाम दुधाच्या दरावर होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मुसळधार आणि काही प्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे देशातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागतोय. या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या चारा पिकांचे मोठे नुकसान झालें. त्याचा सगळ्या मोठा फटका हा सामान्य शेतकऱ्यांना बसला.

जनावरांना घालण्यात येत असलेले पारंपारिक अन्न म्हणजे कोंडा. ते विकत घेणे आता कठीण होऊन बसले आहे. एका पेंढ्याची किंमत ७०० ते ८०० रुपये असा झाला आहे. तर कडबा पेंढीचा दर शेकडा १५००-१८०० इतका वधारला. तर दुसरीकडे, देशातील १५ राज्यांमध्ये लंम्पी रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या रोगामुळे आतापर्यंत सुमारे १ लाख जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर २० लाखांहून अधिक जनावरांना या रोगाची लागण झाली. त्यामुळे महागाईचा आणि रोगराईचा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळं जनावरे जगवावी तरी कशी या विवंचनेत बळीराजा सापडला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!