Just another WordPress site

महागाईचा भडक्यानं सर्वसामान्य पोळणार! अमूलचे दूध महागले, प्रतीलिटर २ रूपयांची वाढ

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसणार असून अमूल दूध दरात प्रती लिटर दोन रूपयांची वाढ होणार आहे. डाळ, तेल आणि महत्त्वाच्या वस्तूवरील वाढत्या भावाबरोबरच दुधाचेही भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सध्या अमूलच्या एका लीटर दुधासाठी ६१ रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एका लिटर दुधासाठी ६३ रूपये मोजावे लागणार आहेत. तर आजपासून अमूलने ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

दरम्यान, डाळी, तेल आणि महत्त्वाच्या खाद्यपदार्थांच्या भावात नुकतीच वाढ झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. तर दिवाळी तोंडावर आली असून दुधाचेही भाव वाढल्यामुळे महागाईने ग्राहकांना झळा सहन कराव्या लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!