Just another WordPress site

प्रवाशांनो, दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीचा प्रवास महागला, ‘एसटी’कडून भाडेवाढ जाहीर!

मुंबई: दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाने भाडेवाढ जाहीर केली आहे, त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशावर भार वाढणार आहे. एसटी महामंडळाने २० ऑक्टोबरपासून पाच रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंतची दरवाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे.ही वाढ हंगामी असून दिवाळीच्या दरम्यान महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दिवाळीच्या सणानिमीत्त एसटी महामंडळाकडून बस तिकीटांचे दर वाढवण्यात आले आहेत, ही दरवाढ आज जाहीर करण्यात आली असून मागच्या काही दिवसात एसटीचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता हा हंगामी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. २० ऑक्टोबर रात्री १२ वाजल्यापासून ही भाडेवाढ राज्यभर लागू होणार आहे.

एसटीने ५ ते ७४ रुपयांपर्यंतची दरवाढ केली असून दादर-स्वारगेट मार्गावर सध्या २२५ रुपये दर आहे तो या काळात २६० रुपये असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी ३५० असलेल्या दरात ३८५ रुपये इतकी वाढ केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

 

या गाड्या वगळल्या जाणार

भाडेवाढ करताना शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांना ही भाडेवाढ करताना त्यामुन वगळण्यात आले आहे. या गाड्या सोडून बाकीच्या साधी गाडी, निम आराम गाडी आणि शिवशाही या गाड्यांना ही भाडेवाढ लागू असणार आहे. तसेच दिवाळीसाठी एसटीच्या १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत या गाड्या धावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!