Just another WordPress site

बॉस हो तो एैसा! प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ६३ लाख पगार अन् वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा

आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकाला आपल्या मनासारखा जॉब हवा असतो. त्याचबरोबर मनासारखा पगार मिळाला तर त्याहूनही सोनं होतं. मात्र, प्रत्यक्षात इतकी सुविधा कोणती कंपनी देणार हाही प्रश्न आहेच. पण, जर तुम्हाला सांगितलं की या जगात असाही एक जॉब आहे, जिथं तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जॉब करता येतो आणि बदल्यात पगारही  कित्येक पटींनी जास्त दिला जातो. तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांनी ६३ लाखांचं पॅकेज देतेय.

महत्वाच्या बाबी

१. ग्रॅव्हिटी पेमेंट्स नावाची कंपनी देते रग्गड पगार
२. एका कर्मचाऱ्याला वर्षाचा पगार ६३.७ लाख रुपये
३. ही कंपनी देते वर्क फ्रॉम होम करण्याचं स्वातंत्र्य
४. मालक डॅन प्राइस यांची सोशल मीडियावर चर्चा

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील बहुतेक देश आर्थिक मंदीकडे जाताहेत. अशातच खर्च वाचवण्यासाठी बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकताहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले. मात्र, या सगळ्यात एक अशी कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवतेय. या कंपनीचे संस्थापक सीईओ आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षाला एक दोन नाही तर ६३ लाखांचे पॅकेज देताहेत. या कंपनीच्या बॉसने ही घोषणा केली. सध्या हा बॉस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून असा बॉस प्रत्येकाला मिळावा, अशा प्रतिक्रिया येताहेत. अमेरिकेतील ग्रॅव्हिटी पेमेंट्स नावाची एक क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग कंपनी असून या कंपनीचे मालक डॅन प्राइस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षाचा ६३.७ लाख रुपये पगार आणि घरुन काम करण्याची मुभा दिलीय. त्यांनी ट्विट करून सांगिलतं की, कोणीही वाईट वातावरणात काम करू इच्छित नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार दिली पाहिजे. ६ वर्षांपूर्वी त्यांनी कंपनीतील प्रत्येक कर्मचार्‍याचा पगार ७० हजार डॉलरपर्यंत कसा वाढवता येईल, याचा विचार केला होता. आणि सध्या त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा ८० हजार डॉलरपर्यंत वाढवला.  कर्मचाऱ्यांची पगार वाढल्यापासून कंपनीचा महसूलही तिपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. डॅन प्राइस यांनी आधीही आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला होता. २०२१ मध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार ५१ लाख रुपयांवर नेला.  यासाठी त्यांनी त्यांच्या पगारात ७ कोटींची कपात केली होती. एवढंच नाही, तर त्यांनी आपलं दुसरं घरही विकलं होतं. त्यामुळं ते चांगलेच चर्चेत आले होते. विशेष म्हणजे त्यांचा पगार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार सारखाच आहे. कर्मचाऱ्याला भरघोस पगार देण्यावरुन त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. कर्मचाऱ्यांना एवढा पगार देणे योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणं आहे,  तर काही जण असा बॉस प्रत्येकाला मिळावा, अशी प्रतिक्रिया देताहेत.  एखाद्या कंपनीच्या  यशामागे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा मोठा हात असतो. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आणि बॉसकडून काही अपेक्षा असतात, ज्या कधी न सांगता पूर्ण होतात, तर कधी त्यांना निराश व्हावं लागतं. मात्र, डॅन प्राइस यांनी  आपल्या कर्मचाऱ्यांना भरपूर सुविधा दिल्या. त्यामुळे त्याला जगातला सर्वोत्तम बॉस म्हटलं जातंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!