Just another WordPress site

भीषण अघघात! मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री भीषण अपघात; पाच जण जागीच ठार, तीन जण गंभीर जखमी

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पुण्याहुन मुंबईच्या दिशेने येत असलेल्या अर्टिगा कारला बोरघाटात एका वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये पाच जणांपैकी चार जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यु झाला. या अपघातात अर्टिगाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या अर्टिगा कारला रात्री बारा वाजताच्या सुमारास अपघात झाला. पिंपरी चिंचवड येथे राहणारे कुटुंब मुंबईला जात होते. यावेळी बोरघाटात ढेकू गावाच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. तर दरवाजा मोडल्याने प्रवासी बाहेर फेकले गेले. अतिरक्तस्त्रावामुळे पाच जणांपैकी चार जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेतांना मृत्यु झाला. सर्व जखमींवर कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरून जात असलेल्या एका वाहन चालकाने महामार्ग पोलिसांना या घटनेबद्दलची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. तिघा जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!