Just another WordPress site

सनी लियोनी देणार शिक्षक पात्रतेची परीक्षा? TET च्या हॉलतिकीटवर सनी लिओनीचा फोटो

नवी दिल्ली : अभिनेत्री सनी लियोनी शिक्षक पात्रतेची परीक्षा देणार आहे ? अस तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु सनीचा फोटो असलेलं ॲडमीट कार्ड दाखवलं तर… तर तुम्ही आणखीनच चक्रावून जाल. सध्या असाच काहीसा प्रकार सोशल मिडीआयवर सुरु आहे. सनी लियोनीचा फोटो असलेल ॲडमीट कार्ड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. एका परीक्षार्थीच्या कार्डवर थेट सनीचा फोटो झळकल्याने शिक्षकांसह सर्वजण चक्रावून गेले आहेत.

सनीचा फोटो असलेले हे ॲडमीटकार्ड कर्नाटकातील एका विद्यार्थिनीचे असून टीईटी परीक्षे संदर्भातील आहे.ही विद्यार्थिनी रुद्रप्पा कॉलेजातील असून तिने मुख्याध्यापिकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली. ॲडमीटकार्डवरील सनीचा बोल्ड फोटो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

परीक्षा विभागाने देखील घडलेल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. या सर्व प्रकाराची माहिती कर्नाटक काँग्रेसचे चेअरमन बी आर नायडू यांनी ट्विट करत समोर आणली. टीईटी परीक्षेच्या ऍडमिट कार्डवर सनी लियोनीचा फोटो आल्याने याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेत्याने केली आहे.

सोशल मीडियावर याबाबत नेटकऱ्यांकडून जोरदार कमेंटबाजी सुरु असताना कर्नाटकात आता थेट भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक शिक्षण विभागाकडून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!