Just another WordPress site

भीषण अपघात : लातूर ते जहिराबाबद महामार्गावर उसाच्या उभ्या ट्रॉलीला दुचाकी धडकून एकाचा बळी

लातूर : लातूर ते जहिराबाबद महामार्गावरील तगरखेडा मोडजवळ उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात हलगरा येथील डॉ. निलेश हेडे यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

निलंगा तालुक्यातील हलगरा येथील डॉ. निलेश दीपक हेडे (वय ३५) औराद शहाजानी येथील रुग्णालयाचे कामकाज आटोपून हलगरा येथे आपल्या गावाकडे जात होते. रात्री ९.३० च्या सुमारास तगरखेडा मोडजवळ उभे असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. यात डॉ. निलेश हेडे हे गंभीर जखमी झाले. याच वेळी पाठीमागून येणारे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनी डॉ. हेडे यांना औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी निलेश हेडे यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, तीन भावंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!