Just another WordPress site

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस; रेखा तौर यांची घोषणा

मुंबई : मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. सत्तार ज्या ठिकाणी दौऱ्यावर असतील त्या ठिकाणी त्यांचे कपडे फाडणाऱ्या १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने केली आहे. राष्ट्रवादी सत्तारांविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा तौर यांनी सत्तारांनी केलेल्या विधानसभा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,सत्तारांनी सुप्रिया सुळेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. तसेच ताईंकडे एव्हडं सगळं आहे की,त्या तुमच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. पन्नास खोके एकदम ओके अशी टीका यावेळी तौर यांनी केली.

अब्दुल सत्तारांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तौर म्हणाल्या,अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथं दौऱ्यावर फिरत असतील तिथं त्यांचे कपडे काढा,जो कार्यकर्ता त्यांचे कपडे काढेल त्याला मी १० लाखांचे बक्षीस देईल असं आवाहनच यावेळी रेखा तौर यांनी केलं. तसेच सत्तार तुमची माफी आम्हाला नको असं म्हणत,मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सत्तारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रेखा तौर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!