Just another WordPress site

सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण! कमाल भाव 4 हजार 700 रुपये, साठवणूक करावी की विक्री?

अकोला : यंदा सोयाबीनला (Soybeans) हवे तसे दर मिळाले नाहीत. परंतु, दर वाढतील या अपेक्षेत शेतकरी (Farmer) होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सोयाबीनच्या दरात (Soybean rates) सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. विदर्भातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akola Agricultural Produce Market Committee) गेल्या चार दिवसांत सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल 400 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक (Soybean growers) शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल 4 हजार 700 रुपये भाव मिळत आहे. या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले.

2023 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी फारसं चांगलं राहिलं नाही. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. या फटक्यातून काही शेतकऱ्यांची पीकं वाचली होती. या पिकांना योग्य भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, कापसाचे भाव घसरत असतानाच सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण होत आहे. सोयाबीनला भाव नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. दरम्यान, सुरुवातीपासूनच सोयाबीनचे दर दबावात असले तरी दराने साडेपाच हजाराचा टप्पा गाठला होता. दिवाळीनंतर सोयाबीन बाजार तेजीत राहतील असा कयास होता. परंतु, दिवाळीनंतर तर दरात घसरण होऊन क्विंटलमागे तब्बल 400 रुपये घटले. गत महिन्यात साडेपाच ते पावणेसहा हजारावर गेलेले सोयाबीन आता सरसरी पाच हजाराच्याही खाली आले आहेत.

सोयीबीनच्या दरात सातत्याने दरात घसरण होऊन आता कमाल 4 हजार 700 रुपये इतक्या नीचांकावर आले आहेत. वायदे बाजाराचा परिणाम असल्याचे अभ्यासक मानत असून, आंतरराष्ट्रीय बाजारही निराशाजनक असल्याचे सांगत आहेत.

दरवाढीच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीन विकले नाही. परंतु, दरवाढीचे कोणतेच संकेत नसल्याने साठवणूक केलेले शेतकरी संभ्रमात आले आहेत. एकीकडे यंदा आधीच मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट तर दुसरीकडे सातत्याने पडत असलेले दर सोयाबीन उत्पादकांची कोंडी करीत आहेत. तर सोयाबीनच्या दरात केवळ 100 रुपयाची वाढ-घट होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अर्थकारण कोलमडले
गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथम क्रमांकावर असून, हेच शेतकऱ्यांचे नगदी असलेल्या जिल्ह्याची ओळख आता सोयाबीन पीक होऊन बसले आहे. पूर्वीची कॉटन बेल्ट म्हणून होत आहे. परंतु, हे पीकही आता शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नसल्याचे गेल्या दोन वर्षाच्या दराने स्पष्ट होत आहे.

दरात एक हजाराची घसरण
शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून मात्र दोन ते तीन क्विंटलचा एकरी उतारा मिळाला आहे. शिवाय, बाजारात सोयाबीनला अपेक्षित असा भावही मिळत नाही. गेल्या महिन्यात बाजारभावात चारशे रुपयांची वाढ झाली होती. साडेपाच ते पावणेसहा हजार रुपये दर मिळाला होता. यामुळे आगामी काळात आणखी भाव वाढतील अशी आशा होती. पण झाले याच्या उलट, सोयाबीन दर ४ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

वायदे बाजाराचा परिणाम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाच्या शेवटच्या दिवशी वायद्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव पडले. आंतरराष्ट्रीय बाजारातील निराशा कायम असल्याने सोयाबीन पुन्हा १३ डॉलरपेक्षा कमी झाले. शुक्रवारी वायदे १२.९२ डॉलरवर बंद झाले. तर सोयापेंड ३८६ डॉलरवर बंद झाली. देशातील बाजारातही पडसाद उमटले. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी भाव २५ रुपयांनी कमी केले होते. सोयाबीन बाजारातील परिस्थिती पाहिल्यानंतर भावात पुढील दोन आठवडे १०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने सोयाबीनची एमएसपी वाढवावी
राज्यात काही वर्षांपूर्वी सोयाबीन 9 हजार ते 11 हजार रुपये दराने विकले गेले होते. त्यावेळी विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळत होता. तर 2023 मध्ये सोयाबीनला 5,400 रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला आहे. त्यानंतर सोयाबीनचे दर गडगडले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेष बाब म्हणजे सोयाबीनचा हमी भाव 5,600 रुपये आहे. तरीही सोयाबीनची कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळं शेतकरी वर्गाची चांगलीच कोंडी होत आहे. परिणामी, केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ करावी, अशी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!