Just another WordPress site

अजितदादा भल्यापहाटे कोल्हेंच्या मतदारसंघात; म्हणाले, ‘काल जे सांगितलं ते माझं फायनल’

Ajit Pawar on Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निशाण्यावर आता शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आले आहेत. काल अजित पवार यांनी ‘शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणाणकरच’ असा निर्धार व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिले. त्यानंतर आज सकाळीच ते अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, आज पत्रकारांनी या भेटीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा काहीही संबंध नाही, हा दौरा पूर्वनियोजित होता.

ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, नव्या कुस्ती महासंघाची मान्यता सरकारकडून रद्द, संजय सिंहना हटवलं 

अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात येणार्‍या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी भागातील विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना अजित पवार म्हणाले, “कालच्या चॅलेंजच्या आणि आजच्या शिरुरमधील कार्यक्रमाचा काही संबंध नाही. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना लख लाभ! मी काल सांगितलं ते माझं फायनल”, असे पवार यांनी म्हटले आहे.

अमोल कोल्हेंबद्दल अजित पवार काय म्हणाले होते?

एका खासदाराने आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असते तर बरं झाले असतं. एक खासदार एक ते दीड वर्षांपूर्वी राजीनामा देणार होते. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं.

मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरकले नाहीत. पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. ‘मी एक कलावंत आहे. माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नवह्तो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळं कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता.

दरम्यान, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते विलास लांडे यांनी आपण शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. याबाबत लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे लांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!