Just another WordPress site

सौरव गांगुली देणार BCCI राजीनामा, ‘ही’ व्यक्ती होणार BCCI चेअध्यक्ष

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयची अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली २०१९ मध्ये बोर्डाचा अध्यक्ष बनला होता पण तो राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील (AGM) राज्य संघटना प्रतिनिधींची यादी समोर आली आहे. त्यात अनेक आश्चर्यकारक नावे आहेत. या यादीत समाविष्ट असलेली व्यक्तीच बीसीसीआयची निवडणूक लढवू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आता नवा अध्यक्ष मिळू शकतो.

रॉजर बिन्नी यांच्या नावाचा समावेश

१९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी याच्या नावाचा समावेश प्रतिनिधींमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सचिव संतोष मेनन एजीएममध्ये सहभागी होत असत. आता त्यांच्या जागी रॉजर बिन्नीच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिन्नी यांचे नाव बीसीसीआयमध्ये मोठे पद मिळणार असल्याने त्यांना देण्यात आले आहे. तो भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ताही राहिला आहे.

बिन्नी नवे अध्यक्ष होऊ शकतात

रॉजर बिन्नीबीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. यात अविशेक दालमिया यांचेही नाव नाही. ते बीसीसीआयमधील पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. एजीएममध्ये सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे प्रतिनिधी बनल्याने, आता हे स्पष्ट झाले आहे की बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा बोर्डाच्या पुढील व्यवस्थेचा भाग असणार नाही.

सचिनच राहणार जय शाह
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (GCA) अध्यक्ष जय शाह बोर्डात सचिनच्या भूमिकेत राहू शकतात. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचे अरुणसिंह धुमाळ हे खजिनदारपदासाठी दावा मांडणार आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jetley) यांचा मुलगा रोहन जेटली याला बोर्ड किंवा आयपीएलमध्ये (IPL) मोठी भूमिका मिळू शकते. यासोबतच राजीव शुक्ला आणि अनिरुद्ध चौधरी हेही या पदाच्या शर्यतीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!