Just another WordPress site

पोलिसच झाले हैवान, पोलिसांकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, गुप्तांगावर मारली लाथ

रांची : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन पोलिसांनी एका ५० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर या नराधमांनी पीडित महिलेच्या गुप्तांगावर लाथही मारली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एक महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. तेव्हा दोन पोलीस कर्मचरी दारूच्या नशेत तिथून जात होते, तेव्हा या दोघांनी महिलेला उचलून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही या नराधम आरोपींनी महिलेच्या गुप्तांगावर लाथ मारली. यामुळे महिला रक्तबंबाळ झाली.

पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. महिलेला आधी लोहरधागा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर महिलेची तब्येत खालावल्यानंतर रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात हलवण्यात आले. महिलेच्या शरीरातून रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती खालावली होती. पीडित महिलेची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच डॉक्टरांची एक टीम महिलेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे असेही डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली असून आरोपींविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. रांचीचे पोलीस उपनिरीक्षन अनिश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची ओळख पटवली आहे. एका आरोपीचे नाव कृष्णा कांत तिवारी आणि अजय बारा आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांना निलंबीत करण्यात आले असून त्यांच्यावर कडक कारावाई करण्यात येईल असेही गुप्ता म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!