Just another WordPress site

फुटबॉलपटू पेले यांचे निधन, ८२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, फुटबॉल विश्वात शोककळा

साओ पाउलो: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले ( संपूर्ण नाव- एड्सन अरांतेस दो नासिमेंतो) यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन वेळा फुटबॉल वर्ल्डकप जिंकणारे पेले हे एकमेव खेळाडू आहेत. त्यांनी १९५८, १९६२ आणि १९७० अशी तीन विजेतेपद मिळवली आहेत.

पेले यांना नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडत गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या शरीरातील कोलोन ट्यूमर हटवण्यात आला. त्यानंतर कीमो थेरेपी करण्यात आली होती. याआधी ते अनेकदा रुग्णालयात दाखल झाले होते. पेले यांना हदया संदर्भातील आजार होता. कीमो थेरेपी उपचाराचा काही परिणाम होताना दिसत नव्हता.

ब्राझीलला ३ वेळा वर्ल्डकप जिंकून दिला
पेले यांनी ब्राझीलला ३ वेळा विश्वविजेतपद मिळवून दिले होते. १९५८ साली सुदानविरुद्ध अंतिम सामन्यात त्यांनी २ गोल केले होते. व्यवसाइक करिअरमध्ये पेले यांनी १ हजार ३६३ सामने खेळले आणि १ हजार २८१ गोल केले. तर ब्राझीलसाठी ९१ सामन्यात ७७ गोल केले. पेले यांच्या इतके वर्ल्डकप आजवर अन्य कोणत्याही खेळाडूला जिंकता आले नाहीत. त्यांनी एकूण ४ वर्ल्डकप खेळले, १९७१ साली त्यांनी राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली.

१९५८ साली पेले यांनी पहिला वर्ल्डकप जिंकले तेव्हा ते फक्त १७ वर्ष २३९ दिवसाचे होते. ५८च्या वर्ल्डकपमध्ये वेल्सविरुद्धच्या सामन्यात क्वॉर्टर फायनलमध्ये पेले यांनी स्पर्धेतील पहिला गोल केला होता. वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी वयात गोल करणारे ते खेळाडू ठरले होते. १७ वर्ष २४४ दिवशी सर्वात कमी वयात वर्ल्डकपमध्ये गोल करण्याचा विक्रम त्यांनी केला होता. त्यांनी फ्रान्सविरुद्ध हॅट्रिक केली होती. १८ वर्षापेक्षा कमी वय असताना वर्ल्डकपमध्ये गोल करणारे ते एकमेव खेळाडू आहेत.

१९९४ साली पेले यांची UNESCOने Goodwill Ambassador म्हणून नियुक्ती केली होती. १९९५ साली ब्राझीलच्या अध्यक्षांनी त्यांची क्रीडा मंत्रालयात विशेष पद तयार केले. त्यांच्या कार्यकाळात पेले यांनी देशातील फुटबॉलमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठीचा कायदा प्रस्तावित केला होता. हा कायदा पेले कायदा म्हणून ओळखला जाऊ लागला. १९९८ साली अध्यक्षांनी हे पद निलंबित केले.

पेले यांनी १९५९ या एका वर्षात १२७ तर १९६१ साली ११० गोल केले होते. अशी कामगिरी करणारे ते जगातील एकमेव फुटबॉलपटू आहेत. त्यांच्याशिवाय झांबियाचा फुटबॉलपटू गॉडफ्रे चितालूने १९७२ साली क्लब आणि देशाकडून खेळताना १०७ गोल केले. पण पेले यांनी १०० गोलचा आकडा सलग दोन वेळा पार केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!