Just another WordPress site

धक्कादायक! आईच्या दूधात आढळलं ‘मायक्रोप्लास्टिक’; इटलीतील संधोधकांचा दावा, पाहा, नेमका बाळाला काय धोका?

आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली. इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात हे मायक्रोप्लास्टिक शोधले.

 

महत्वाच्या बाबी

१. आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत
२. बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या दुधात आढळले मायक्रोप्लास्टिक
३. दुधात ५ मिलिमिटरपेक्षा कमी आकाराचे मायक्रोप्लास्टिकचे कण
४. मायक्रोप्लास्टिकमुळे बाळाला होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग!

 

खरंतर आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटलं जातं की, नऊ महिने एखाद्या बाळाला पोटात वाढवल्यानंतर त्याला जन्म देताना त्या महिलेचा पुर्नजन्म होतो. आई झाल्यावर तिच्या जबाबदाऱ्याही वाढतात. बाळाला सांभाळणं, त्याला न्हाऊ-माखू घालणं यांसारख्या अनेक गोष्टी तिला कराव्या लागतात. त्यापैकीच एक म्हणजे, बाळाला दूध पाजणं. आईचं दूध बाळासाठी अमृतासमानचं असतं. आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. मात्र, बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळले. इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक शोधले.

पॉलिमर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक सापडले असल्यानं संशोधकांच्या एका गटानं गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच, अशा परिस्थितीत स्तनपान करणं योग्य की, अयोग्य यांसारखे अनेक प्रश्न संशोधकांना पडले. दुसरीकडे पाहिलं तर, आईच्या दुधाचे नवजात बाळाला अनेक फायदे आहेत. त्याच्या आरोग्यासाठी आईच दूध एखाद्या नवसंजीवनी प्रमाणेच आहे. त्यामुळे संशोधकांच्या चिंता आणखी वाढल्या. आईच्या दुधात जर प्लास्टिकचे कण आढळत असतील तर आगाी नवजात बालकांसाठी तसेच आगामी पिढ्यांसाठी हे धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.

या अहवालानुसार मानवी दुधात ५ मिलिमिटरपेक्षा कमी आकाराचे मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले. हा अभ्यास करण्यासाठी रोममधील एकूण ३४ निरोगी मातांकडून दुधाचे नमुने घेण्यात आले होते. या अभ्यासात आईच्या दुधामध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळले. ही एक चिंतेची बाब असून त्याचा नवजात बालकांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे या अभ्यासात सांगण्यात आलंय. ३४ नमुन्यांपैकी एकूण २६ नमुन्यात हे मायक्रोप्लास्टिक आढळले. या मायक्रोप्लास्टिकचा रंग, आकार, रासायनिक रचना याआधारे वर्गीकरण करण्यात आले. संशोधकांना मानवी दुधात पॉलिथीन, पीव्हीसी, पॉलीप्रोपायलीन असे प्लास्टिकचे नमुने आढळले. प्लास्टिकचे हे सर्व प्रकार पॅकेजिंगसाठी वापरले जातात. या अभ्यासात संशोधक २ मायक्रॉनपेक्षा कमी आकार असलेल्या प्लास्टिकचा शोध घेऊ शकले नाहीत. मात्र २ मायक्रॉनपेक्षा कमी आकार असलेले प्लास्टिकचे कणही आईच्या दुधात असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. मायक्रोप्लास्टिकचे कण दूषित हवा, अन्न, पाणी यांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्रवेश करतात. एका अभ्यासानुसार आपण सेवन करत असलेल्या अन्नाच्या माध्यमातून दरवर्षी साधारण ५२ हजार मायक्रोप्लास्टिकचे कण आपल्या शरीरात जातात. मायक्रोप्लास्टिकमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. याआधीही मानवी शरीरात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळलेले आहेत.
नेदरलँड्समधील व्रिजे युनिव्हर्सिटी अॅमस्टरडॅमधील प्राध्यापक डिक वेथाक यांनी मायक्रोप्लास्टिकचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, शरीरात मायक्रोप्लास्टिकचे कण सापडणे म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. नॅनोप्लास्टिकचे कण त्यापेक्षा हानिकारक असू शकतात. तर दुसरीकडे नोटारस्टेफानो यांनी ताज्या अभ्यासात आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले असले तरी स्तनपान बंद करू नये, असा सल्ला दिला. आईच्या दुधामुळे बाळाला होणारा फायदा दुधात मायक्रोप्लास्टिक असल्याने होणाऱ्या हानीपेक्षा अधिक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, युनिव्हर्सिटी पॉलिटेसिनिया डेले मार्चेच्या प्राध्यापिका डॉ. व्हॅलेंटीना नोटारस्टेफानो यांनी सांगितले की, गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी प्लास्टिकच्या भांड्यातील अन्न खाणे किंवा प्लास्टिकच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!