Just another WordPress site

कामाच्या बहाण्यानं घरी बोलावलं अन् नंतर…; व्हिडिओ पोस्ट करून ‘या’ अभिनेत्रीने साजिद खानवर केले गंभीर आरोप

बिग बॉसचं घर म्हटलं की वाद विवाद आलेच. या कार्यक्रमाचा प्रत्येक सिझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहतो. बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. पण यावेळी त्याआधीपासूनच वाद सुरु झाला होता. तो बिग बॉसमध्ये सामील झालेल्या एका स्पर्धकामुळे. साजिद खानने स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून प्रेक्षक संतापले. साजिद खान हा सध्या अनेकांच्या रडारवर आहे. शर्लिन चोप्रा हिच्यानंतर आता ‘दिया और बाती’ फेम कनिष्का सोनीनं साजिदवर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले.

 

महत्वाच्या बाबी

१. ‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाला १ ऑक्टोबरपासून सुरुवात
२. साजिद खानने स्पर्धक म्हणून घेतली ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
३. कनिष्का सोनीचे साजिदवर गंभीर आणि धक्कादायक आरोप
४. आता साजिद खानच्या विरोधात महिला आयोगानेही केली तक्रार

 

मीटूच्या आरोपांमध्ये अडकलेला बॉलिवूडचा दिग्दर्शक साजिद खान बिग बॉस १६ शोमध्ये सहभागी झाला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका होतेय. साजिद खानला घराबाहेर काढा अशी प्रेक्षक सतत मागणी करत आहेत. तर काही अभिनेत्रींनी पुन्हा एकदा साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. आता ‘दिया और बाती’ फेम अभिनेत्री कनिष्का सोनीने साजिद खानवर गंभीर आरोप केले. कनिष्काने साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप करत म्हटलंय की, मला साजिद खानने घरी बोलून एक विचित्र मागणी केली होती. कनिष्काने यापूर्वीही साजिद खान याच्यावर आरोप केला होता, मात्र भीतीपोटी तिने त्याचे नाव घेतले नव्हते. मात्र कनिष्काने आता साजिद खान याचे नाव घेतले असून ही मंडळी खूप खतरनाक असल्याचं तिने सांगितलं. कनिष्का सोनीने केलेल्या आरोपमुळे आता बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ निर्माण झालीये.

कनिष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तिनं साजिद खानविषयी धक्कादायक खुलासे केलेत. या व्हिडीओमध्ये तिने साजिदने माझा लैंगिक छळ केला असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की एका दिग्दर्शक-निर्मात्याने मला घरी बोलावून माझं पोट दाखवण्यास सांगितलं होतं. मला त्या दिग्दर्शकाचं नाव घ्यायचं नाही असं मी म्हटलं होतं. पण मला अशी वागणूक देणारी व्यक्ती ही ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आहे.” “मी आधी त्या दिग्दर्शकाचं नाव घेणार नव्हती. पण त्याचं नाव घेण्यापूर्वी मी खूप घाबरली आहे. मला भारतात येण्याचीही भीती वाटत आहे. कारण अशी लोकं काहीही करू शकतात. ‘बिग बॉस’ने त्याला जी प्रसिद्धी दिली आहे त्यासाठी तो योग्य नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे साजिद खान. २००८मध्ये मी काही रिअॅलिटी शो केले. तेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं. त्यादरम्यान मी सेलिब्रिटी मंडळींची मुलाखत घ्यायचे. यादरम्यान मी साजिद खानची मुलाखत घेतली. तसेच मुलाखत झाल्यानंतर आपल्याला अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे. मला मदत कराल का? असं मी त्यांना म्हटलं. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं.” पुढं तनिष्काने लिहिलं की, “तुझी शरीररचना मुख्य अभिनेत्रीसाठी अगदी परफेक्ट आहे. आता तुझं पोट दाखव. घाबरू नको मी तुला टचही करणार नाही असं साजिद त्यावेळी म्हणाला. मात्र, माझं पोट दाखवण्यास मी नकार दिल्यानंतर त्याने चित्रपटामध्ये तुला काम देणार नाही असं सांगितलं. काही वर्षांनंतर मी पुन्हा एकदा साजिदला भेटले. त्यावेळीही त्याने याचप्रकारची वागणूक मला दिली. इतकंच नव्हे तर माझ्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. सलमान खानने त्याला ‘बिग बॉस’मध्ये घ्यायला पाहिजे नव्हतं असंही कनिष्का यावेळी म्हणाली.

दरम्यान, महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून चित्रपट निर्माता साजिद खानला बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून काढून टाकण्याची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!