Just another WordPress site

धक्कादायक! मेक्सिकोमध्ये बंदुकधाऱ्यांनी केला अंदाधुंद गोळीबार, हल्ल्यात महापौरांसह तब्बल १८ जणांचा मृत्यू

मेक्सिको : मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनांत वाढ झालेली आहे. या घटनांना थांबवण्यासाठी अमेरिकी सरकारने कठोर निर्णय घेण्याचे सूतोवाच केले होते. असे असतानाच येथील मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन या भागात गोळीबाराची घटना घडली. मेक्सिको येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात १८ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेत मेक्सिकोचे महापौर कॉनरॅडो मेंडोझा यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही यामध्ये मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेक्सिकन सिटी हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये प्रवेश केला. काही वेळ थांबून त्याने अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला. गोळीबारात महापौरांव्यतिरिक्त त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. सिटी हॉल परिसरात झालेल्या या गोळीबारानंतर एकच खळबळ उडाली असून लॉस टेक्विलेरोस या गुन्हेगारी टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या टोळीच्या सदस्यांनी तसा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित केला. मात्र येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी हा हल्ला कोणी केला, हे अद्याप सांगता येणार नाही, असे सांगितले. या हल्ल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचण्यास उशीर व्हावा म्हणून हल्लेखोरांच्या साथीदारांनी रस्त्यात वाहने उभी केली होती. दरम्यान, संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!