Just another WordPress site

सावधान! दारू पुरुषांच्या लैंगिक जीवनात ठरतेय अडथळा, दारू पिल्याने सुरू होतात ‘या’ गंभीर लैंगिक समस्या

मद्यपान हे तणाव कमी करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी केलं जातं, असं मानलं जातं. अर्थात,त्यामुळे कुठलाही तणाव कमी होत नसला तरी दारुची नशा प्रश्नांपासून काही काळ दूर ठेवत असल्याचा अनुभव अनेकांना असतो. मात्र एका मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात दारुचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊन स्वतःवरील नियंत्रण सुटायला सुरुवात होते. आपल्या चालण्याफिरण्यावर, बॅलन्स करण्यावर आणि निर्णयक्षमतेवरही त्याचा परिणाम होत असतो. पुरुषांच्या कामभावनेवरही दारुचा गंभीर परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक समस्यांना सुरुवात होते. जाणून घेऊया, नेमक्या कुठल्या समस्या अल्कोहोलच्या अतिसेवनाने सुरू होतात.

स्पर्म काउंट होतो कमी

रक्तातीत झिंक हा घटक शोषून घेण्याची शरीराची क्षमता ही अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे कमी होऊ लागते. शुक्राणूंमध्ये झिंकचं प्रमाण लक्षणीय असतं. मात्र शरीराला झिंक मिळण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे शुक्राणूंच्या दर्जावर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे महिलेला गर्भवती करण्याची पुरुषाची क्षमता कमी होते आणि बाप होण्याचं स्वप्न लांबणीवर पडू शकतं.

 

प्रजनन क्षमतेवर परिणाम

चांगल्या आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी अल्कोहोल मारक ठरण्याची शक्यता असते. यामुळे व्यक्तीची प्रजनन क्षमता कमी होते. मद्यपान बंद केल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे कुठल्याही व्यक्तीला त्याचा मूड, ऊर्जा, झोप आणि वजन या सगळ्या निकषांमध्ये सुधारणा झाल्याचे अनुभव येतात.

वाढू शकतो स्पर्म काउंट

मद्यपान कऱणाऱ्या व्यक्तींचा स्पर्म काउंट इतरांच्या तुलनेत कमी असल्याचं दिसतं. मात्र मद्यपान बंद केल्यानंतर यात सुधारणा होत असल्याचंही सिद्ध झालं आहे. मद्यपान बंद करून आरोग्यपूर्ण जीवनशैली सुरु केल्यानंतर स्पर्म काउंटमध्ये सुधारणा होत असल्याचं डॉक्टर सांगतात.

 

टेस्टोस्टेरॉनची पातळी होते कमी

अतिरिक्त मद्यपानामुळे टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत कमालीची घट होत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मद्यपानामुळे व्यक्तीला वाटणारी चिंता काही काळासाठी दूर झाल्याचा भास होत असेलही, मात्र त्याचे परिणाम फारच गंभीर असल्याचं दिसून येतं. दीर्घकाळ अल्कोहोल शरीरात गेल्यामुळे कोर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.

 

व्यायामाची गरज

अल्कोहोलच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय मानला जातो. टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवणे आणि स्पर्म काउंट वाढवणे यासाठी व्यायामाचा उत्तम उपयोग होतो. त्याशिवाय तणाव कमी करणे, मानसिक आरोग्य सुधारणे आणि इतर लैंगिक समस्याही व्यायामामुळे दूर होण्यास मदत होते. त्यासोबत चांगली जीवनशैली, योगा, प्राणायाम यासारख्या उपायांनीदेखील अल्कोहोलचे दुष्परिणाम कमी होतात.

 

डिस्क्लेमर – अल्कोहोलपासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबतची ही काही सामान्य निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!