Just another WordPress site

आंध्र प्रदेशमध्ये धक्कादायक घटना, चंद्राबाबू नायडूंच्या रोडशोमध्ये चेंगराचेंगरी, ८ जणांचा मृत्यू

नेल्लोर : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. चंद्राबाबू नायडू कंदुकुरमध्ये रोड शो करत होते. यावेळी त्यांचा ताफा गुडम सीवेज नहरवरुन वरून जात होता. यावेळेस चेंगराचेंगरी झाली आणि काही जण खाली पडले यावेळी तीन जणांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. दोन जण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींना नेल्लोरमध्ये आणि काही जणांना विजयवाडाला उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

कंदुकुरमध्ये दुर्घटना घडलेल्या ठिकाणावरुन रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला. आणखी सहा जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे

मिळालेल्या माहितीनुसार चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. यामुळं चेंगराचेंगरी झाली आणि काही जण खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नायडू यांनी त्यांची सभा रद्द केली आहे.

चेंगराचेंगरीत ज्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना टीडीपीतर्फे १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी जखमींच्या उपचारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

चंद्राबाबू नायडू हे २८ ते ३० डिसेंबर दरम्यान नेल्लोर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा करत आहेत. याचवेळी ते कवाली, कंदुकुर आणि कोवूर मध्ये विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार असून वेगवेगळ्या भागात रोडशो करणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!