Just another WordPress site

शरद पवारांना मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये (BJP) परतण्याची चिन्हे आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा शब्द दिल्यानेच त्यांची सून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना पुन्हा भाजपाने उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) आधी ठरतो की निवडणुकीनंतर याबाबत उत्सुकता आहे.

Loksabha Election 2024 : फडणवीसांनी आश्वासने देऊन केली मतदारांची दिशाभूल, कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपमध्ये जाण्याचे सध्यातरी कुठलेही कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र जेव्हाही जाईन त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेन. शरद पवार
यांच्या संमतीनेच जाईन. लपून-छपून जाणार नाही, असे वक्तव्य केले होते.

Mahayuti Seat Allocation : ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा द्या; भाजपने वाढवली CM शिंदेंची डोकेदुखी 

एकनाथ खडसे यांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपमध्ये काम केले आहे. पण काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे त्यांना पक्ष सोडणे भाग पडले. त्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, खडसे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून अलीकडच्या काळात दिल्लीतून हालचाली झाल्याचे समजते. विशेषत: राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. या संभाव्य प्रवेशामुळे रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी दिला होता. पण खडसे यांनी त्यास नकार दिला. आता खडसे हे आपल्या सुनेला निवडून आणण्यासाठी हातभार लावतील अशी चर्चादेखील भाजपमध्ये आहे. दरम्यान, भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा आणि जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे. चौधरी यांना तर अडीच वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. मात्र, ईडीच्या कारवाईत त्यांना आता जामीन मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!