Just another WordPress site

Loksabha Election 2024 : फडणवीसांनी आश्वासने देऊन केली मतदारांची दिशाभूल, कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Loksabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या मागणीनुसार काही व्यक्तींवरील गुन्हे मागे घेण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी आश्वासन देऊन निवडणूक आचारसंहितेच (Election Code of Conduct) भंग केला आहे, अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer) यांना पत्र पाठवून फडणवीस व सातपुते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Mahayuti Seat Allocation : ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा द्या; भाजपने वाढवली CM शिंदेंची डोकेदुखी 

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्रात लोंढे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करुन काही व्यक्तींवर करोना काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. गृहमंत्री फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासन दिले. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने प्रलोभन दाखिवणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय गुन्हे मागणे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रभावित करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे. फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत असून त्यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करावी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

भाजपने आरोप फेटाळला
मोची समुदायावरील प्रलंबित दखलपात्र गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी त्या समाजाचे कार्यकर्ते भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांना भेटले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन मागितले. यात फडणवीस यांनीही कायदेशीर प्रक्रिया राबवून गुन्हा मागे घेण्याबाबत स्पष्ट केले आहे. यातून निवडणूक आचारसंहिता भंग होत नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!