Just another WordPress site

जगातील ‘हे’ सात सर्वात खतरनाक कुत्रे, हल्ला झाला तर सुटका अशक्यच

कुत्रा  जगातील सगळ्यात विश्वासू प्राणी. मात्र कुत्र्याने मालकाला किंवा अन्य कुणाला चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या. काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने ११ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर १५० टाके पडले. तर लखनऊमध्ये पिटबूलच्या हल्ल्यात एका वृद्धेला जीव गमवावा लागला. त्याच निमित्ताने आज जगातील धोकादायक कुत्र्यांबद्दल जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. कुत्रा हा जगातील सगळ्यात विश्वासू प्राणी
२. दररोज सरासरी दहा कुत्रे चावल्याचा घटना
३. पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्रा
४. जर्मन शेफर्डला धोका जाणवल्यास ते हल्ला करतात

 

कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. यासोबतच ते त्यांच्या मालकाशी खूप निष्ठावान असतात. मात्र, जगात कुत्र्यांच्या काही प्रजाती आहेत. धोक्याची सूचना मिळताच ते समोरच्यावर हल्ला करतात. त्यांच्या तावडीतून सुटणे अशक्य असते.

 

पिटबुल

पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्रा मानला जातो. पिट बुल जातीचे कुत्रे आक्रमक आणि अतिशय धोकादायक असतात. या जातीच्या कुत्र्यांवर विश्वास ठेवणे जीवावर बेतू शकते. या जातीच्या कुत्र्यांनी मालकालाही चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जगभरातील अनेक देशांनी या जातीच्या कुत्र्यांच्या जन्मावर देखील बंदी आहे. मात्र, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आजही पिट बुल पाळले जातात. त्यामध्ये भारतही एक देश आहे.

 

जर्मन शेफर्ड

जर्मन शेफर्ड ही कुत्र्याची प्रजाती जर्मनीची आहे. असे मानले जाते की बहुतेक लोकांना जर्मन शेफर्ड आवडतात. या जातीचे कुत्रे त्यांच्या ताकद आणि निर्भयतेसाठी जगभरात ओळखले जातात. जर्मन शेफर्ड जितके धोकादायक आहेत तितकेच ते मैत्रीपूर्ण आहेत. थोडासा धोका जाणवल्यास ते कोणावरही हल्ला करतात. ते खूप चपळ आणि वेगवान देखील असतात.

 

रॉटवेलर

रॉटवेलर जातीचे कुत्रे सर्वात शक्तिशाली मानले जातात. तसेच, आक्रमक झाल्यावर ते कुणालाही चावा घेण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. या जातीच्या कुत्र्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. अनेक देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही जात चपळाईसाठी ओळखली जाते. त्यांचा स्वभाव पटकन आक्रमक होतो. भारतातही अनेक घरांमध्ये हे पाळले जातात. रॉटवेलर्सना थोडासाही धोका जाणवल्यास ते कोणावरही हल्ला करतात. जर त्यांना समजले की त्यांचे मालक रागावले आहेत, तर ते त्यांच्यासाठीही अत्यंत धोकादायक असू शकतात.

 

वुल्फ हायब्रिड

लांडगे आणि कुत्र्यांच्या प्रजननातून वुल्फ हायब्रीड कुत्र्यांच्या अनेक जाती निर्माण झाल्या आहेत. या कारणास्तव त्यांना वुल्फ हायब्रिड प्रजाती म्हणतात. या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये या जातीच्या कुत्र्यांच्या पैदाशीवर बंदी घालण्यात आली आहे.

 

डॉबरमॅन पिंचर्स

डॉबरमॅन पिंचर्स जातीचे कुत्रे सुरक्षिततेसाठी ठेवण्यात येतात. म्हणूनच तुम्ही त्यांना बहुतेक पोलीस आणि सैन्यासोबत पाहिले असेल. कधीकधी त्यांचा चेहरा इतका आक्रमक असतो की, पाहूनच धडकी भरते. शिकारी जातीचा हा कुत्रा गुह्याच्या शोधात मदत करतो. सध्या त्याला सामान्य लोकंही आवड म्हणून पाळताना दिसत आहेत. या जातीचे कुत्रे अनोळखी माणसांना पाहून आक्रमक होतात, प्रसंगी हल्ला देखील करतात.

 

चाऊ चाऊ

चीनमध्ये आढळणारे चाऊ-चाऊ कुत्रे दिसायला खूप गोंडस आणि शांत असतात. पण या जातीचे कुत्रे अत्यंत धोकादायक देखील असतात. हा जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांपैकी एक आहे. त्यांच्या संमतीशिवाय कोणीही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही, कारण ते स्वतःच्या मर्जीचे मालक असतात.

 

प्रेसा कॅनेरिओ

प्रेसा कॅनेरिओ देखील जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांपैकी एक आहे. आफ्रिकेत आढळणाऱ्या या प्रजातीच्या कुत्र्यांचे वजन माणसांच्या बरोबरीचे असते. ते ६० किलो पर्यंत असतात. ते अत्यंत धोकादायक मानले जातात. जर ते एखाद्यावर हल्ला करतात, तर त्यातून सुटणे फार कठीण असते.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!