Just another WordPress site

अंकिता भंडारी हत्या प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक; रिसॉर्टही केले जमीनदोस्त

झारखंड : रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची एका खासगी रिसॉर्टमध्ये हत्या करण्यात आली आहे. अंकिता भंडारी खून प्रकरणात कोटद्वार पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य याच्यासह तिघांना अटक केली. या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

महत्वाच्या बाबी

१. रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची खासगी रिसोर्टमध्ये हत्या
२. अंकिता खून प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक
३. न्यायालयाने आरोपींना सुनावली १४ दिवसांची पोलीस कोठडी
४. आरोपींमध्ये भाजप नेते विनोद आर्यांच्या मुलाचाही समावेश

 

पौडी गढवाल येथील १९ वर्षीय अंकिता भंडारी हिच्या हत्येने उत्तराखंडमधील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अंकिता भंडारी खून प्रकरणावरून लोकांमध्ये संतापाचे वातावरण होते. आरोपींना पोलिसांनी अटक चौकशीसाठी नेले असता संतप्त लोकांनी त्यांना मारहाण केली.
अंकिता ही पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर भागातील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट होती. हे रिसॉर्ट पुलकित आर्य याचं आहे. अंकिता १९ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. १९ सप्टेंबर रोजी सकाळी अंकिता तिच्या खोलीत दिसली नाही. तेव्हा तिचे वडील रिसॉर्टमध्ये पोहोचले आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र, मुलीचा शोध न लागल्याने मुलगी हवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू होती. यावर डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, पोलिसांकडे याबाबत हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर २४ तासात तीन आरोपींना लक्ष्मण झुला पोलिसांनी अटक केली. या तीन आरोपींनी अंकिताला टेकडीवरून खाली नदीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य यालाही या प्रकरणी अटक करण्यात आली. अंकिता जिथे काम करायची त्या रिसॉर्टचा पुल्कित आर्य हा संचालक होता. चार दिवसांपासून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर रिसॉर्टचा संचालक आणि व्यवस्थापक दोघेही फरार होते. पुलकित सोबत त्याचे आणखी दोन साथीदार अंकित उर्फ ​​पुलकित गुप्ता आणि सौरभ भास्कर यांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी रिसॉर्टवर बुलडोजर चालवला.
पुलिकत हा विनोद आर्य यांचा मुलगा आहे. विनोद आर्य हे भाजपचे बडे नेते असून ते ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. तसंच ते यूपीचे सहप्रभारी आहेत. यापूर्वी ते राज्यमंत्रीही राहिलेले आहेत. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने १४ दिवसांच्या पोलिस कोठडीवर आरोपींना कारागृहात पाठवले. दरम्यान, धामी सरकार अंकिताला न्याय मिळवून देणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!