Just another WordPress site

तुर्तास जॅकलिनला मिळाला कोर्टाकडून दिलासा, २०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

मुंबई : २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव चांगलेच अडकले आहे. याप्रकरणी जॅकलिनची सतत चौकशी देखील सुरु आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी तपासाची सूत्रे अभिनेत्रीच्या स्टायलिस्ट सहकारी लिपक्षीपर्यंत पोहोचली होती. या सर्व चौकशीनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने देखील दावा केला की जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंध आहेत, त्यानंतर अभिनेत्रीला पटियाला हाऊस कोर्टाने समन्स बजावले होते.
जॅकलिनच्या वकिलाने पटियाला हाऊस कोर्टात तिच्यासाठी जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याचवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनीही जॅकलिनच्या जामीन अर्जावर ईडीकडून उत्तर मागितले आहे.जॅकलिनच्या वकिलाच्या विनंतीवरून न्यायालयाने जॅकलिनला ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे तूर्तास तरी जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
जॅकलिन फर्नांडिसने ठग सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. या प्रकरणात जॅकलीनशिवाय नोरा फतेही आणि निक्की तांबोळीसह आणखी अभिनेत्रींचा समावेश आहे. दोन्ही अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली आहे. २०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्ली तुरुंगात बंद आहे आणि त्याच्यावर १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!