Just another WordPress site

बॉसला सलाम! याला म्हणता दिवाळी गिफ्ट; कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दिल्या कार आणि बाईक भेट

दिवाळी जवळ आली की नोकरदार बोनसची वाट पाहू लागतात. आपला बॉस आपल्याला यंदाच्या दिवाळीला काय बोनस देणार याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता असते. मात्र एका मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुखद धक्का दिला आहे. या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली दिवाळीची भेट पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, “बॉस असावा तर असा!”

तामिळनाडूमध्ये एका सोन्याच्या दुकानाच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास १ कोटी २० लाखांच्या भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून चक्क कार आणि बाईक्स देण्यात आल्या आहेत. ही बातमी वेगाने व्हायरल झाली असून लोकही थक्क झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जयंतीलाल चयंती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून आठ कार आणि १८ बाईक्स दिल्या आहेत. जयंतीलाल म्हणाले, ‘माझे कर्मचारी माझे कुटुंबच आहेत. त्यांनी प्रत्येक परिस्थितीत मला साथ दिली आहे. प्रत्येक प्रसंगात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.’ तसेच, ते म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनाही आनंद मिळतो.

जयंतीलाल पुढे म्हणाले, ‘माझा व्यवसाय वाढवण्यात या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळात ते माझ्याबरोबर होते. यामुळेच मी व्यवसायात नफा कमवत आहे. हे कर्मचारी माझ्या व्यवसायाचे मजबूत स्तंभ आहेत. त्यांच्यामुळेच मी एक यशस्वी उद्योजक आहे.’ दरम्यान, दिवाळीची भेटवस्तू म्हणून कार आणि बाईक्स मिळाल्यामुळे कर्मचारी खूपच खुश आणि भावूकही झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!