Just another WordPress site

अमेरिकेच्या वृत्तपत्रात अर्थमंत्री सीतारामण यांना म्हटलं वाँटेड; ज्यांनी ही जाहिरात दिली ते रामचंद्रन विश्वनाथन आहेत तरी कोण?

अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने मोदी सरकारच्या विरोधात जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. या जाहिरातीमध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह १४ वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना परदेशी गुंतवणूकदारांचा विरोधक असल्याचं सांगण्यात आलं. तसंच ते वाँटेड असल्याचंही म्हटलंय. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार कंचन गुप्ता यांनी दावा केला की ही मोहिम देवास मल्टीमीडियाचे माजी सीईओ रामचंद्रन विश्वनाथन चालवत आहेत. याच निमित्ताने जाणून घेऊया की मोदी सरकार विरोधात जाहिरात देणारे रामचंद्रन विश्वनाथन आहेत तरी कोण ?

 

महत्वाच्या बाबी

१. अमेरिकेच्या वृत्तपत्रात अर्थमंत्री सीतारामण यांना म्हटलं वाँटेड
२. सीईओ रामचंद्रन विश्वनाथन यांनी ही जाहिरात दिल्याचा दावा
३. माहिती-प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार कंचन गुप्ता यांचा दावा
४. रामचंद्रन विश्वनाथन हे देवास कंपनीचे सहसंस्थापक आहेत

 

अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेली मोदी सरकारविरोधातील ही जाहिरात सध्या वादात आहे. या जाहिरातीमध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह १० वरिष्ठ सरकारी हे वाँटेड असल्याचंही म्हटलंय. त्यामुळं भारतात मोठा वाद निर्माण झाला. निर्मला सीतारामण या सध्या जी२०च्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरच्या बैठकीमध्ये अमेरिकेत सहभागी झाल्या आहेत. अशा वेळी अमेरिकन वृत्तपत्रातील या जाहिरातीची चर्चा होतेय. या जाहिरातीमध्ये निर्मला सीतारामण यांच्याशिवाय एंट्रिक्स कॉर्पचे अध्यक्ष राकेश शशिभूषण, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गुप्ता, व्ही रामसुब्रमण्यम, स्पेशल पीसी अॅक्ट न्यायाधीश चंद्रशेखर, सीबीआय डीएसपी आशिष पारिक, ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन वेंकटरामन यांची नावे जाहिरातीत आहेत. ही जाहिरात १३ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली.
संबंधित व्यक्तींनी सरकारी संस्थांचा गैरवापर करून भारताला गुंतवणुकदारांसाठी असुरक्षित केलं आहे. अशा आरोप जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार कंचन गुप्ता यांनी दावा केला की ही मोहिम देवास मल्टीमीडियाचे माजी सीईओ रामचंद्रन विश्वनाथन चालवत आहेत.

रामचंद्रन विश्वनाथन हे भारतीय वंशाचे व्यापारी असून ते अमेरिकेचे नागरिक आहेत. रामचंद्रन विश्वनाथन देवास कंपनीचे सहसंस्थापक आहेत. बेंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी देवास मल्टीमीडिया आणि इस्रोची कमर्शियल कंपनी एंट्रिक्स कॉर्पोरेशन यांच्यात २००५ मध्ये एक करार झाला होता. तो नंतर रद्द झाला. सप्टेंबर महिन्यात बेंगळुरूच्या एका विशेष न्यायालयाने ईडीच्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी विश्वनाथन यांना फरारी आर्थिक गुन्हेगार ठरवण्याला परवानी दिली. ऑगस्ट महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने देवास मल्टीमीडियाच्या बाजूने देण्यात आलेला निर्णय बदलला. १.३ अब्ज डॉलर्सचा हा खटला इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या विरोधात होता. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या विश्वनाथन यांना अटक व्हावी असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. द्विपक्षीय कायदा म्युच्युअल लीगल असिस्टंट ट्रिटीअंतर्गत विश्वनाथन यांच्या मॉरिशस येथील देवास कंपनीची खाती गोठवली होती. विश्वनाथ यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासंदर्भात तसंच अमेरिकेकडून प्रत्यार्पणाची मागणी भारताने इंटरपोलकडे केली आहे. दुसरीकडे देवास मल्डीमीडिया कंपनीने आपली कायदेशीर लढाई जारी ठेवली. आयसीसीच्या निर्णयाच्या आधारे देवास कंपनीने अमेरिका, फ्रान्स आणि कॅनडातील न्यायालयात धाव घेतली आहे. अँट्रिक्स कॉर्पोरेशनच्या अमेरिकेतील अकाऊंटमधून ८७ हजार डॉलर आणि पॅरिसमधील संपत्ती जप्त करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!