Just another WordPress site

रशियाची नामुष्की! खारकीव्हमधून रशियाची माघार, खारकीव्ह शहरावर युक्रेन लष्करचा ताबा

रशिया युक्रेन युद्धाला जवळपास सहा महिने उलटून गेले तरी कुणीच माघार घ्यायला तयार नाही. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून प्रतिहल्ल्यामुळे खारकीव्हमधून रशियाला सैन्य माघारी घेण्याची वेळ आली. युक्रेनच्या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे रशियाचे सैन्य टिकाव धरू शकले नसल्याने रशियाला युक्रेनकडून मोठा धक्का बसला.

महत्वाच्या बाबी

१. रशियाची युक्रेन विरुद्धच्या युद्धात पिछेहाट
२. खारकीव्ह शहरातून रशियन फौजांची माघार
३. खारकीव्ह शहरावर युक्रेन लष्करचा ताबा
४. खारकीव्हमधून माघार घेतल्यानं रशियाची नामुष्की

 

खारकीव्ह हे युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसांमध्येच या शहरावर ताबा मिळवला होता. त्यामुळे रशिया-युक्रेन यांच्यात युध्द पेटले होते. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी दीर्घकालीन युद्धाचे सुतोवाच केले. नंतर रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या युध्दात अमेरिकेबरोबरच युरोपातील अनेक देश युक्रेनच्या पाठीशी उभे राहिले होते, तर, काही देश रशियाच्या पाठीशी उभे राहिले. अमेरिकेने आपण युक्रेनच्या बरोबर असल्याचे वेळोवेळी कृतीतून दर्शवले. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेकडून दारूगोळा, शस्त्रास्त्रे आणि इतर युद्धसामग्री युक्रेनला सुपूर्द करण्यात आली. रशियाला युक्रेनमधून हुसकावून लावण्यासाठी युक्रेनकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळं युक्रेन रशियाला कठीण जात असल्याचे दिसत होते. प्रत्येक गावासाठी त्यांच्या लष्कराला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. तरीही हल्ला केल्यानंतर काही दिवसांतच युक्रेनचा ताबा हातात येण्याची अपेक्षा असलेल्या रशियाने युक्रेनचा पूर्वेकडील भाग आणि दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेतला होता. मात्र, युक्रेन सैनिकांनी ऑगस्टच्या अखेरपासून सुरु केलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे हा ताब्यात आलेला भागही आता रशियाच्या हातून निसटून चालला असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून युक्रेन सैन्यांची अत्यंत जलद आगेकूच सुरू असून युद्धाची चित्रे पालटण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून मिळत असलेल्या शस्त्रबळाच्या जोरावर युक्रेन करत असलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे रशियाचे सैनिक बेजार झाले असून दक्षिण आणि पूर्वेकडील अनेक भागांमधून त्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली. युक्रेनचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या या युद्धाला आज दोनशे दिवस पूर्ण झाले असून युक्रेन सैनिकांनी केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे रशियावर खारकिव्ह या मोठ्या शहरातून सैन्यमाघारी जाहीर करण्याची नामुष्की ओढवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!