Just another WordPress site

शेतकऱ्यांना तातडीने पिककर्ज उपलब्ध करून द्या; ‘सिबील स्कोअर’ करीता कर्जास अडवणूक केल्यास कारवाई

अमरावती : यावर्षीचा खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना या हंगामाकरिता पिककर्जाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे पिककर्जासाठी शेतकरी बँकांचे खेटे घालीत आहे. अशातच काही बँकांकडून ‘सिबील स्कोअर’च्या (Cibil Score) नावे अडवणूक केल्या जात असून बँका शेतकऱ्यांना पिककर्ज (Crop Loan) नाकारित असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होत आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांची‘सिबील स्कोअर’ करीता अडवणूक करू नये अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी सर्व बँकांना दिला आहे. (Provide immediate Crop Loans to farmers; Action against loan foreclosure for ‘CIBIL SCORE’)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याकरिता सर्व बँकांना लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार तातडिने पिककर्ज उपलब्ध करून देणे हे सर्व बँकांचे कर्तव्य आहे. असे असतांनाही काही बँका शेतकऱ्यांची अडवणूक करण्याकरिता पिककर्ज उपलब्ध करून देण्याकरिता ‘सिबील स्कोअर’ची अट समोर करीत आहे. शेतकऱ्यांना सिबील स्कोअर कमी असल्याचे सांगून पिककर्ज नाकारून त्यांना परतवून लावल्या जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहे. राज्याच्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या २५ मे २०२३ च्या परिपत्रकानुसार बँकांनी पिककर्जाकरिता ‘सिबील स्कोअर’ ग्राह्य धरू नये असे सांगितले आहे. सोबतच रिझर्व बँकेच्या त्यामुळे बँकांनी आता पिककर्ज परिपत्रकानुसार पिककर्जाकरिता ‘नो ड्यू’ची मागणी न करता ग्राहकांच्या कर्जाची हिस्ट्री तपासण्याकरिता एसएलबीसीच्या आदेशाची ‘सिबील’ सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग घ्यावा असे सांगितले आहे. त्यामुळे आता बॅंकींनी सिबिल स्कोअर करीत शेतकऱ्यांना कर्ज नाकारू नये, अन्यथा एसएलबीसीच्या आदेशाची अवहेलना केल्याचे गृहीत धरून नियमानुसार बँकावर कार्यवाही केल्या जाईल, असा इशारा जिल्हा प्रबंधकांनी सर्व बँकांना दिला आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना तातडिने पिककर्ज उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही करण्यात आल्या आहे.

केंद्र शासनाचे जन्म मृत्यू दाखल्याचे CRS Portal बंद; प्रवेशप्रक्रिया, शासकीय कामे खोळंबली 

पिक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्यावर भर
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता बि-बीयाणे व खते घेण्यासाठी सोय व्हावी म्हणून जुन्या कर्जाची परतफेड केली आहे. परंतु आता काही बँका ‘सिबील स्कोअर’ची अट घालून शेतकऱ्यांना पिककर्ज नाकारत असल्याने खरिपाच्या कर्ज वाटपाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडिने कर्ज मिळावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा प्रबंधकांच्या सर्व बँकांना सूचना
गेल्या वर्षीचा खरिप हंगाम हा अतिवृष्टीमुळे नापिकीचा ठरला. त्यातच हाती आलेले अल्प उत्पादनाला बाजारात समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला. खरिपा पाठोपाठ रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना हवी तशी साथ न दिल्याने शेतकऱ्यांनी उचल केलेल्या पिककर्जाची परतफेड करू शकला नाही. अशा शेतकऱ्यांना नविन हंगामाला सामोरे जातांना पैशाची चणचण भासत असली तरी त्याला नव्याने कर्ज उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यातच बँकांनी ‘सिबील स्कोअर’ ची अट घातल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. प्रशासनाने दिलेला कार्यवाहीचा आदेश बँका कितपत गांभीर्याने घेतात, हे बघावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!