Just another WordPress site

चित्रकर्ते ज्याँ-लूक गोदार यांचे निधन

पॅरिस :फ्रान्समध्ये १९६० च्या दशकातील लोकप्रिय चित्रपटांत क्रांती घडवणाऱ्या ‘फ्रेंच न्यू वेव्ह’चे प्रणेते अशी ओळख प्रस्थापित करणारे विख्यात दिग्दर्शक ज्याँ- लूक गोदार यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. युद्धोत्तर काळातील सर्वात प्रभावशाली फ्रेंच चित्रकर्ते अशी त्यांची ओळख होती.
३ डिसेंबर १९३० रोजी पॅरिसमध्ये एका श्रीमंत फ्रेंच-स्विस कुटुंबात जन्मलेल्या गोदार यांनी ‘अपारंपरिक कल्पनांचे जनक’ म्हणून आपले वेगळेपण जपले. अनेक वर्षे युरोपसह सर्व जगभर महत्त्वाचे, तसेच वादग्रस्त दिग्दर्शक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. १९६० मध्ये पहिल्या ‘ब्रेथलेस’ या वैशिष्टय़पूर्ण चित्रपटाने त्यांनी आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली.
२०१० साली ऑस्कर अकादमीने गोदार यांना त्यांच्या चित्रपटीय कारकीर्दीचा सन्मान म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला, मात्र तो पुरस्कार त्यांनी नाकारला.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!