Just another WordPress site

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामुळं दिल्लीचं रुपडं पालटणारे बिमल पटेल आहेत तरी कोण?

राजपथावरील प्रस्तावित सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आणि सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यूचे उद्‍घाटन केले. देशात सध्या दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची चर्चा सुरुये. दरम्यान, हा प्रकल्पाचे काम केले तरी कोणी? याच विषयी जाणून घेऊ.

महत्वाच्या बाबी

१. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
२. पीएम मोदींनी केले सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यूचे उद्‍घाटन
३. सेंट्रल व्हिस्टाचे डिझाईनचे काम बिमल पटेल यांनी केले
४. पटेल पद्मश्री पुरस्कारांसह अन्य पुरस्कारांनी सन्मानीत
सेंट्रल विस्टा… पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचं नवं निवास्थान, एकाच ठिकाणी सर्व मंत्रालयं, उपराष्ट्रपती निवास, एसपीजी मुख्यालय अशा सगळ्या इमारती या सेंट्रल विस्टा अंतर्गत उभारण्यात आल्या. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या साडेतीन चार किलोमीटर परिसरामध्ये हा प्रकल्प उभारला गेला. वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर, अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि पुरीतील जगन्नाथ मंदिराचे मास्टर प्लॅनिंग या भारताच्या सांस्कृतिक आणि शहरी लँडस्केपची ही सर्व प्रतीके भलेही भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये असतील, मात्र, त्यांचा मास्टर आर्किटेक्ट एकच आहे, त्यांचं नाव आहे बिमल पटेल. पंतप्रधान मोदींनीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे डिझाईनची जबाबदारीही पटेल यांच्याकडे सोपवली होती. बिमल हसमुख पटेल यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६१ रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांनी सेंट झेवियर्स शाळेत आपले प्राथमिक शिक्षण घेतले. लहानपणी त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते, मात्र, शिक्षकांनी त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाविषयी विचार करण्याची प्रेरणा दिली.
त्यांचे वडील देखील आर्किटेक्ट होते. यामुळे त्यांनी बारावीनंतर आर्किटेक्चरची निवड केली. आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा केल्यानंतर, त्यांनी आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स, सिटी प्लॅनिंगमध्ये मास्टर्स आणि बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातून सिटी अँड रीजनल प्लॅनिंगमध्ये पीएचडी मिळवली. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी HCP डिझाईन कंपनी सुरु केली. सुरूवातीला या कंपनीत फक्त ४० लोक काम करायचे. मात्र, आता या कंपनीचा व्याप बराच वाढला असून आज या कंपनीत तब्बल ३०० हून अधिक लोक काम करतात. आज कंपनीचे अहमदाबाद, दिल्ली आणि पुणे येथे कार्यालये आहेत. १९९० मध्ये पटेल आपल्या वडिलांसोबत अहमदाबादमध्ये काम करायला लागले. त्यांचा पहिला प्रकल्प अहमदाबादमधील उद्योजकता विकास संस्थेसाठी डिझाईन करण्याचा होता. नंतर त्यांनी अनेक कामांचे डिझाईन केले. त्यांना वास्तुविशारद क्षेत्रात ३५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांना वास्तुविशारद क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारांस इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. दरम्यान, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या डिझाईनसाठी बिमल पटेल यांची निवड झाल्यानंतर त्यांना विरोधकांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र, तरीही टीकेला न जुमानता त्यांनी सेंट्रल व्हिस्टाचे काम तडीस नेले. दरम्यान, या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून हजारोंच्या संख्येनं मजूर काम करत होते. अखेर हे काम पूर्ण झाल्यानं या प्रकल्पामुळे
दिल्लीचं रुपडं पालटलं.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!