Just another WordPress site

जगात ८०० कोटींपैकी फक्त ४५ लोकांच्या शरीरामध्ये आहे ‘गोल्डन ब्लड’, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षाही जास्त

मुंबई : जगभरातील लोकांची संख्या ही ८०० कोटींवर गेली आहे. तुम्ही विज्ञानात शिकले असाल की, या पृथ्वीवर असलेल्या लोकांमध्ये ८ प्रकारचे रक्तगट आढळतात. ज्यामध्ये A+, A-, B+, B-, O+, O-, AB+, AB- यांचा समावेश होतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल. की जगात आणखी एक K नावाचा रक्तगट देखील आहे. जो फक्त ४५ लोकांमध्ये आहे. यालाच ‘गोल्डन ब्लड’ देखील म्हटले जाते.

गोल्डन ब्लड हा एक दुर्मिळ रक्तगट आहे. या रक्तगटाचे दुसरे नाव Rhnull असे आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगातील केवळ ४५ लोकांच्या शरीरात हे गोल्डन ब्लड आढळतं. पण हे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकते. या गटाचे रक्त फार कमी लोकांमध्ये आढळते, म्हणूनच हा रक्तगट दुर्मिळ मानला जातो.

या रक्तगटाचे जगात फक्त ९ दाता आहेत. याचा अर्थ असा की, इतर ३६ लोकं हे रक्तदान करण्याच्या स्थितीत नाहीत किंवा ते रक्तदान करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच या रक्तगटाच्या रक्ताच्या एका थेंबाची किंमत एक ग्रॅम सोन्यापेक्षा जास्त आहे. या कारणास्तव त्याला गोल्डन ब्लड ग्रुप असे नाव देण्यात आले आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन वेबसाइटनुसार, १९६१ मध्ये पहिल्यांदा हा रक्तगट ऑस्ट्रेलियातील एका आदिवासी महिलेच्या शरीरात आढळला होता. यानंतर ऑस्ट्रेलियातील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर जीएच वोझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत सविस्तर अहवाल तयार केला.

गोल्डन ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते. त्यामुळेच त्यांना अॅनिमिया होण्याचा धोका अधिक असतो. आई आणि पोटात असलेल्या बाळाचा रक्तगट सारखा (K) असला तर गर्भपात होण्याची शक्यता वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा लोकांची किडनी निकामी होण्याचीही शक्यता असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!