Just another WordPress site

‘तुझ्या नवऱ्याला सोड..’; नकार दिल्यानंतर प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या, नंतर लाइव्ह येऊन स्वत:लाही संपवलं

सिलीगुडी : वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडलीय. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे फ्रिजमध्ये ठेवले तर काही तुकड्यांची विल्हेवाट जंगलात लावली. या धक्कादायक घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमध्येही एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रिहा बिश्वास असं खून झालेल्या तरूणीचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसी रिहाचा खून केल्यानंतर तिचा प्रियकर किरण डेबनाथने फेसबुक लाईव्ह करत धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरोपी किरण आणि रिहा हे गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रिहाचे लग्न झाले होते. यामुळेच दोघांना एकत्र राहता येत नव्हते. किरण रिहावर पतीला सोडण्यासाठी अनेक दिवसांपासून दबाव टाकत होता. यासाठी रिहाने नकार दिल्याने किरणने तिला बेदम मारहाण केली आणि नंतर तिची हत्या केली. सिलीगुरी पोलिसांना सोमवारी रिहाचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहाच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोलीस तपासात ही घटना तिच्या प्रियकराने केल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला, रिहाचा खून केल्यानंतर किरणने काही वेळानंतर सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह करत स्वत:लाही संपवलं. रविवारी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून किरणने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!