Just another WordPress site

ऐकावं ते नवलचं! बस स्थानकात उभी असलेल्या ‘लालपरी’चं अपहरण, एसटी बस चालकाकडून पोलीसात तक्रार

बुलडाणा : बुलडाणा बसस्थानकात एक चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस स्थानकातून अचानक बस चोरीला गेल्याची घटना घडला आहे. दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. बसचालक आणि वाहक हे बसस्थानकातील विश्रांती कक्षात झोपले होते. दरम्यान मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ही बस चालू करून पळवून नेल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्य परिवहन महामंडळाची ST चोरीला गेल्याची घटना (दि.१३) रविवारी रात्री बुलढाण्यातील देऊळगाव राजा बस स्थानकात घडली. विश्रांती कक्षात चालक आणि वाहक झोपलेले असताना बस चोरीला गेली. बस स्थानक परिसरातून बस चोरीला गेल्याने प्रशासनाची झोप उडाली. एसटी बस चोरीला गेल्याची तक्रार देऊळगाव पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. अचानक घडलेल्या घटनेने जोरदार चर्चा रंगली आहे.

बस चोरीच्या घटनेने देऊळगाव राजा स्थानकातील अधिकारीही हैराण झाले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर बस आढळली. बस सापडल्याने चालक आणि वाहकाचा जीव भांड्यात पडला. सदर बस अज्ञाताने सुरू करून चिखली मार्गाने जाताना बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळल्याने नादुरुस्त अवस्थेत बस रस्त्यात उभी करून पोबारा केला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरण चौकशी सुरू केली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथी मॅक्डोनल्डस् रेस्टॉरंटच्या स्टोअर रूममध्ये चोरी झाली आहे. स्टोअर रुममध्ये तब्बल ७२ हजार रुपये किंमतीचे तेलाचे कॅन लंपास केले. पण चोरट्याला लोणावळा पोलिसांच्या जलदगती कारवाईमुळे रंगेहाथ जेरबंद करण्यात यश आले आहे. सुमंत सुनिल पडवळ असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!