Just another WordPress site

आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनाचा ईडीने पाठवली नोटीस, चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात त्यांना ही नोटीस पाठवण्याता आली आहे. उद्या (२ नोव्हेंबर) मुख्यमंत्री सोरेन यांनी चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

खाण प्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्या घरावर छापा टाकताना ईडीला त्यांच्या बँकेचे पासबुक आणि सीएम हेमंत सोरेन यांचे स्वाक्षरी असलेले चेकबुक सापडल्याची माहिती ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

ईडीने १६ सप्टेंबर रोजी पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. तसेच झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी कोषाध्यक्ष रवी केजरीवाल यांचा जबाबही नोंदवला आहे. त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पंकज मिश्रा यांना संथाल परगणा येथून दगड आणि वाळू उत्खननातून येणारा पैसा थेट प्रेम प्रकाशला देण्यास सांगितले होते, असा आरोप आहे.

ईडीच्या आरोपपत्रानुसार, ईडीने ८ जुलै रोजी टाकलेल्या छाप्यादरम्यान पंकज मिश्रा यांच्या निवासस्थानातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये मुख्यमंत्री सोरेन यांचे पासबुकही देखील आहे. एका बंद लिफाफ्यात एक पासबुक आणि दोन चेकबुक सापडले असून त्यातील दोन चेकवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीही आहे. हेमंत सोरेन यांचे बँक ऑफ इंडिया साहिबगंजमध्ये खाते आहे.

ईडीने यापूर्वी हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा, दाहू यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ३७ बँक खात्यांमधील ११.८८ कोटी रुपये पीएमएलए कायद्यांतर्गत जप्त केले होते. यापूर्वी ईडीने साहिबगंज, बरहैत, राजमहल, मिर्झा चौकी आणि बरहरवा येथे १९ ठिकाणी छापेमारी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!