Just another WordPress site

निसर्ग कोपला! वाशिमच्या मंगळूरपीर, मानोरा परिसरात अचानक ढगफुटी सदृश पाऊस! शेतीचे मोठे नुकसान

वाशिम : वर्षभर शेतात काबाड कष्ट केल्यानंतर शेतमाल काढणीची वेळ आली असताना वाशिम जिल्ह्याच्या मानारो, मंगळूरपीर, अनसिंग परिसरात परतीच्या पावसाने हाहाकार माजवत शेतीमालाचे प्रचंड नुकसान केलंय, तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीच वाहून गेली.

 

महत्वाच्या बाबी

१. मानारो, मंगळूरपीर परिसरात परतीच्या पावसाचा हाहाकार
२. पिकांच्या लागवडीचा खर्चही निघणं मुश्कील, शेतकरी चिंतातूर
३. ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांची अतिशय दयनीय अवस्था
४. सरकारकडून बळीराजाला आर्थिक मदतीची भाबडी आशा

 

शेती हंगाम बेभरवशाचा खेळ आहे. कधी होत्याचे नव्हते होईल. याचा नेम नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पुन्हा एकदा खरं ठरलं. आता पिके माल धरण्याच्या अवस्थेत असतांना गत महिन्यापासून पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. जमिनीतली ओल आटल्याने पिकांचे भविष्य अंधकारमय झाले होते. यामुळे शेतकरी मात्र पुरता धास्तावला. अशातच काल पावसाने वाशिम परिसरात अचानक रौद्ररुप धारण केले. परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबले असून सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पीक पावसाने मातीमोल केली. त्यामुळं शेतकऱ्यांचे यंदा अक्षरश: दिवाळं निघालं.

राज्यातील हवामान विभागाने तीन दिवस राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. वाशीम जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक अनेकांचे पिके वाहून गेली. जवळपास तासभर झालेल्या पावसात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असून मका, सोयाबीन, टोमॅटो आणि नुकतीच छाटणी झालेल्या पिकाची अक्षरशः दैना झाली. वाशिम जिल्ह्यात यंदा मानोरा, मंगळूरपीर, अनसिंग परिसरात अतिवृष्टी झाल्याने नागरिक हैराण झाले असून शेतकरी मेटाकुटीला आले. अगोदरच काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती यावेळी हे पिके वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली आणि पिके चांगली सुद्धा आली. मात्र, आता पावसाने कहर केल्यानं पिकांचे मोठं नुकसान झालं. त्यामुळं शेतकरी विवंचनेत सापडला. बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च केला तो निघणं मुश्कील असल्यानं शेतकऱ्यांची झोप उडाली.

ऑगस्टमध्ये झालेल्या पावसानंतर नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे झाले त्याची मदतही अजून पदरी पडलेली नसल्याने पुन्हा मुसळधार पाऊस पडू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला. एकूणच ही पावसाची परिस्थिती पाहता “ये बाबा आता तरी थांब ना” अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपनामुळे हतबल झालेल्या बळीराजाने बॅंकांचे-सोसायट्याचे उंबरठे झिजवून पीकंची लागवड केली. मात्र, परतीच्या पावसाने बळीराजाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आता तरी आमच्या नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करेल आणि काहीतरी आर्थिक मदत करेल आशी भाबडी आशा बळीराजा शेतकरी करतोय.

उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी पुरता हतबल झालेला असताना लोकप्रतिनिधी सत्तेचा खेळ खेळताना दिसतातहेत. तर दुसरीकडे प्रशासन कागदी घोडे नाचवतय. त्यामुळे मायबाप सरकारने बळीराजा पुरता उध्वस्त होण्याआधीच त्याची अवहेलना थांबवावी अशी आर्त विनवणी बळीराजा करतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!