Just another WordPress site

२३ लाखांहून अधिक युजर्सचे Whats App अकाउंट बंद; व्हॉट्सअ‍ॅप वापरताना ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा अकाउंट होऊ शकते कायमचे बंद

व्हॉट्सअप हा दैनंदिन जीवनातील महत्वाचे घटक झाला. मेसेज पाठवणं, माहिती देणं, ग्रुपद्वारे मित्र मैत्रिणींशी संपर्कात राहणं या सोयी व्हॉट्सअपवर आहेत. त्यामुळे युजर्ससाठी अनन्यसाधारण असं आहे. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपनं गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतातील तब्बल २३ लाखांहून जास्त अकाऊंट बंद केले. तर गेल्या जुलै महिन्यात २० लाख ३९ हजार आणि जून महिन्यात २० लाख २१ हजार अकाऊंट बंद केले. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे अकाऊंट का बंद करत आहे? अकाऊंटवर बंदी येऊ नये यासाठी काय करता येईल? याच विषयी जाणून घेऊ.

 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे अकाऊंट का बंद करत आहे?

आजच्या इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येकजन स्मार्टफोन वापरतो. आज स्मार्टफोन वापरत नाही, असा माणून आपल्याला शोधूनही सापडणार नाही. स्मार्टफोन घेतल्यानंतर जे पहिलं अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्या जाते ते म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅप हे युजर्स फ्रेंडली असून त्यावर चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याय. मात्र युजर्सने कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास किंवा हिंसाचाराला उत्तेजन देणाऱ्या पोस्ट केल्यास व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे अकाऊंट बंद करत आहे. शिवाय, भारताच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास अथवा व्हॉट्सअ‍ॅपच्या शर्थींचे पालन न केल्यासही अकाऊंट्सवर कारवाई होऊ शकते.

 

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद होऊ नये यासाठी काय काळजी?

व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा घातल्या. कुठलाही मेसेज फॉरवर्ड करण्याअगोदर त्याची सत्यता तपासणं गरजेचं आहे. चुकीचा किंवा खोटा मेसेज फॉरवर्ड केल्यास तुमच्या अकाऊंटची तक्रार केली जाऊ शकते. शिवाय, जर मेसेजवर ‘फॉरवर्डेड मेनी टाईम्स’ असा टॅग असेल तर ते तुमच्या ग्रुपमध्ये देखील टाकने टाळावे, कारण तुमच्या कृतीतून तुम्ही देखील स्पॅमिंग करत आहेत, असे समजले जाऊ शकते.
गरज नसलेले ऑटोमॅटिक मेसेजेस पाठवण्याऱ्या युजर्सला बॅन करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मशीन लर्निंगचा वापर करते. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणे, ऑटो मेसेज किंवा ऑटो डायल वापरणे टाळा.
ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये एकाचवेळी अनेक लोकांना मेसेज पाठवता येते. मात्र, तुम्ही वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज वापरत असल्यास अनेक लोक तुमच्या मेसेजची तक्रार करू शकतात. त्यामुळं तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट कंपनीकडून बंद करण्यात येऊ शकते.
याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये व्यक्तीला अ‍ॅड करण्यापूर्वी त्या व्यक्तीची परवानगी घ्या. ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यानंतर व्यक्तीने स्वत:हून ग्रुप सोडल्यास त्यांच्या निर्णयाचा आदर करा, त्यांना परत ग्रुपमध्ये टाकू नका. जर कुणी तुम्हाला मेसेज पाठवू नये असे म्हटले तर त्यांना आपल्या कॉन्टॅक्ट यादीतून बाहेर काढा, त्यांना मेसेज करू नका.
व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट सुरळीत वापरायचे असल्यास या कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करू नका. कंपनीच्या नियमांनुसार, खोटा प्रचार, गैरप्रकार, धमकी देणे, घृणास्पद आणि वंशभेदी टीप्पणी करण्यावर बंदी आहे.

 

अकाऊंटवर बंदी आल्यास काय कराल?

व्हॉट्सअ‍ॅपकडून अकाऊंट बंद करण्यात आल्यास तसा मेसेज युजर्सला कंपनीकडून पाठवला जातो. अकाऊंटवर चुकून बंदी घालण्यात आल्यास युजर्स या कंपनीला ईमेल पाठवून तक्रार नोंदवू शकतो. या शिवाय अ‍ॅपवरील ‘request a review’ वर क्लिक केल्यासही संबंधित अकाऊंट संदर्भात मदत मिळू शकते. रिव्ह्यूची विनंती केल्यानंतर तुमच्या फोन क्रमांकावर सहा अंकी क्रमांक कंपनीकडून पाठवण्यात येतो. हा क्रमांक टाकल्यानंतर कंपनीकडे रिव्ह्यूच्या विनंतीची नोंद केली जाईल. या बाबत तपास केल्यानंतर अकाऊंट संदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून वापरकर्त्याशी संपर्क साधला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!