Just another WordPress site

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणार, सीएम शिवराजसिंह चौहान उद्या पुण्यात अनेक उद्योगपतींना भेटणार

महाराष्ट्रातील उद्योगसमूहांना साद घालण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते अनेक उद्योगपतींशी वैयक्तिक भेटी घेणार आहेत. शिवाय, मध्य प्रदेशमधील उद्योगसंधी दाखविण्यासाठी एका परिषदेचेही आयोजन केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर देशातील परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात नेण्याबरोबरच आता दुसऱ्या राज्यातील देशी गुंतवणूकही आपल्या राज्यात नेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून याकडे पाहिले जातंय.

 

महत्वाच्या बाबी

१. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उद्या पुणे दौऱ्यावर
२. चौहान अनेक बड्या उद्योगपतींशी वैयक्तिक भेटणार
३. महाराष्ट्रातील गुंतवणूक मध्य प्रदेशमध्ये होणार का?
४. अन्य राज्यातील गुंतवणूक MP मध्ये करणं भाजपचा डाव

 

मध्यप्रदेशमधील गुंतवणूक वाढावी यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून दरवर्षी या परिषदेचं मध्यप्रदेशमध्ये आयोजन केलं जातं. पण यावर्षी हे आयोजन पुण्यात करण्यात आल्यामुळे अनेकांच्या नजरा विस्फारल्या. ही परिषद झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान महाराष्ट्रातील उद्योगपतींशी वैयक्तिकरित्या चर्चाही करणार आहेत. त्यामध्ये संजय किर्लोसकर, बाबा कल्याणी, आश्विनी मलहोत्रा यांच्यासोबतच इतर उद्योजकांचे नावं आहेत.

खरंतरप पुणं हे औद्योगिकदृष्ट्या विकसनशील शहर आहे. पुण्यात किर्लोस्कर, फोक्सवॅगन, टाटा, महिंद्रा, बजाज या ऑटो उद्योगांबरोबरच आयटी क्षेत्रातलेसुद्धा नावाजलेले उद्योग आहेत. आयटीमधील इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा यांसारख्या नावाजलेल्या विविध कंपन्या पुण्यात आहेत. त्याचबरोबर पुण्यात शिक्षण संस्था, पाणी, वीज, रस्ते आणि सुशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता असल्यामुळे पुणे शहर नेहमीच इतर उद्योजकांना गुंतवणुकीसाठी खुणावत असते. त्याच दृष्टीकोनातून पुण्यातील उद्योजकांना मध्य प्रदेशकडे आकर्षित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली असल्याचा अंदाज आहे.

काही दिवसांपुर्वीच वेदांता फोक्सकॉन पुणे जिल्ह्यातून प्रकल्प गुजरातला गेला. दीड लाख कोटी गुंतवणूक आणि जवळपास एक लाख रोजगारनिर्मिती होणार असलेला प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमुळे भाजपचा हा डाव असल्याचा आरोप अनेकांनी केलाय. अशातच २०२३ मध्ये मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सध्या मध्यप्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. येणाऱ्या निवडणुकांतही सत्ता कायम राखण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये बाहेरच्या राज्यातून गुंतवणूक करून सत्तारूढ होणं, हा भाजपचा डाव असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.. त्यामुळं भविष्यातील महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक आणि प्रकल्प परत महाराष्ट्राबाहेर जाणार का? अशी कुजबूज सुरू झालीये. दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योगांना आपल्या राज्यात नेण्यासाठी अनेक राज्य सातत्याने प्रयत्न करतात. याच प्रयत्नातून मुंबईतील हिऱ्यांचा व्यापार गुजरातला नेला. मध्यंतरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला उत्तर प्रदेशमध्ये येण्याचे आवाहन केले. या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेते हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!