Just another WordPress site

आमदार बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; बाईकच्या धडकेत दुभाजकावर आदळले, मेंदूला दुखापत

अमरावती : महाराष्ट्रात आणखी एका आमदाराचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या सोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांना अमरावतीत अपघात झाला. रस्ता ओलांडत असताना बाईकने धडक दिल्यामुळे कडू जखमी झाल्याची माहिती आहे. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे.

अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांना अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने कडूंना धडक दिली. धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

सकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान बच्चू कडू नेहमीप्रमाणे घराबाहेर निघाले होते. अमरावती शहरातील कठोरा रोड परीसरात ते चालत असताना अचानक एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली

नेमकं काय घडलं?

थंडी व मंद असा अंधार असल्याने काही काळाच्या आत बच्चू कडू खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. अमरावती शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन प्रहारने केले आहे.

बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतून बाहेर पडले होते. सध्या बच्चू कडू मंत्रिपदापासून उपेक्षित आहेत. ते शिंदे-फडणवीस सरकारच्या सोबत असले तरी अधून मधून त्यांची नाराजी समोर येत असते.

आमदारांच्या अपघाताची तिसरी घटना

दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्यातील आमदारांना अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी भाजप आमदार जयकुमार गोरे कार अपघातात भीषण जखमी झाले, तर गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनाही कार अपघातात मोठी दुखापत झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!