Just another WordPress site

हादरवून टाकणारी घटना! थायलंडमध्ये पाळणाघरात बेछूट गोळीबार; २२ चिमुकल्यांसह ३४ जण ठार

थायलंडच्या ईशान्येकडील भागातील एका पाळणाघरात एका बंदूकधारी माथेफिरूने केलेल्या बेछूट गोळीबारात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २२ बालकांसह इतरांचा समावेश आहे. जवळपास १२ जण या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती, पोलिस दलातील उपप्रवक्ता आर्खन क्रेयताँग यांनी दिली. नॉंग बुआ लाम्फू या प्रांतातील ना क्लांग जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधाधुंद गोळीबार करणारी बंदुकधारी व्यक्ती ही माजी पोलिस अधिकारी आहे. पान्या कामराब असे त्याचे नाव असून तो ३४ वर्षांचा आहे. त्याला काही काळापुर्वीच निलंबित करण्यात आले होते. गोळीबारानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते. स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने पत्नीला आणि मुलालाही ठार मारल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून स्थानिक रुग्णालयांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.

या घटनेनंतर पंतप्रधानांनी सर्व तपास यंत्रणांना गुन्हेगांरांना पकडून कारवाईचे आदेश दिले आहेत. थायलंडमध्ये इतर देशांच्या तुलनेत अवैधरित्या बंदूक खरेदी करण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही. बऱ्याच अवैध बंदुका सध्या शेजारील वाद सुरू असलेल्या राष्ट्रांच्या सीमेवरून थायलंडमध्ये आलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!