Just another WordPress site

विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता, महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाशी केली चर्चा

मुंबई: दिवाळी तोंडावर आली असतानाच आता सर्व सामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील वीज आणखी महागणार असून वीज दर वाढवण्याची तयारी सुरू झाली याबाबत महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा देखील केली असल्याची माहिती समोर आली आहे.

वीज बिल वाढीच्या मुद्यावरुन महावितरण आणि विद्युत नियामक आयोग यांच्यामधील बैठकीनंतर आयोगाने कंपनीला दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिल्याचं समजतं आहे.

वीज दरवाढ (दरवृद्धी) याचिका पाच वर्षांसाठी मंजूर केली जाते. आयोगाने २००० मध्ये विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी करून या याचिकेवर आदेश जारी केला होता. त्या नियमानुसार अडीच वर्षांपर्यंत महावितरण दरवाढीची मागणी करू शकत नव्हता मात्र ती मुदत ३० नोव्हेंबरला पूर्ण होत आहे.

याच पार्श्वभूमीवर महावितरणने आता नव्या दरवाढीला मंजुरी मिळविण्यासाठी याचिका दाखल करण्याचा पुढाकार घेतला असून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियामक आयोगात जाऊन दर वृद्धी याचिका दाखल करण्याबाबत चर्चा केली आहे.

त्यानुसार आयोगाने कंपनीला ३० नोव्हेंबरपूर्वी याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या वीज दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार की काय अशा चर्चांनी उधाण आलं आहे. महावितरणमधील सूत्रांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे वीज बिलांची थकबाकी वाढली आहे. ती थकबाकी कंपनी वसुल करू शकली नाही. कोविडच्या काळात एकूण थकबाकी७० हजार कोटी रुपये होती. आत्ता देखील तेवढीच थकबाकी असल्याचं समजतं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!