Just another WordPress site

महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच, शाहू महाराज की संभाजीराजे?

कोल्हापूरः कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातीलच उमेदवार असणार आहे. श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) छत्रपती की माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) याबाबतचा निर्णय चार दिवसात होण्याची शक्यता आहे. सध्या तरी शाहू महाराजांचे नाव आघाडीवर आहे.

सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी; केंद्राच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका 

महाविकास आघाडीने उमेदवार निश्चितीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापूरच्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेसने हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचाही या जागेवर आग्रह आहे, पण या तीनही पक्षाकडे सध्या प्रबळ उमेदवार नसल्याने सर्वांचाच डोळा छत्रपती घराण्यावर आहे. गेल्या सहा महिन्यात विविध माध्यमातून श्रीमंत शाहू महाराज राजकीय सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांना मैदानात उतरवण्यासाठी तीनही पक्ष इच्छूक आहेत. ‘माझी इच्छा नाही’ म्हणत असताना दुसरीकडे ते सक्रिय झाल्याने महाराज कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार याची चर्चा वेगावली आहे.

स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवा; जितेंद्र आव्हाडांचे अजितदादांना आव्हान 

सध्या तरी त्यांचा कल काँग्रेसकडे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची या मतदार संघात ताकद मर्यादित आहे. यामुळे ही जागा आपल्याकडे घेत महाराजांना मैदानात उतरवण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे उमेदवारीसाठी अचानक सक्रिय झाले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत त्यांनी उमेदवारीचे रणशिंग फुंकले आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करा आणि उमेदवारी घ्या असा प्रस्ताव या पक्षाने दिल्याचे समजते, पण ते स्वराज्य पक्ष विलीन करायला तयार नाहीत. जिल्ह्यातील एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात येणार आहे. दुसरी जागा स्वराज्यला सोडण्याची आघाडीची अजिबात इच्छा नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणे छत्रपती घराण्यातीलच असण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. प्रथम उमेदवार निश्चित होईल, त्यानंतरच ही जागा कोणाला हे ठरणार आहे. सध्या तरी ही जागा काँग्रेस अथवा शिवसेनेकडे जाण्याचीच चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!