Just another WordPress site

स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवा; जितेंद्र आव्हाडांचे अजितदादांना आव्हान

ठाणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना हुकूमशहा म्हटले आहे. शरद पवार हे हुकूमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहोचवलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढवण्याची भाषा का करता? हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढून दाखवा. मग महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवेल, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांना दिले. आज पत्रकारांशी आव्हाड यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

लहान मुले निवडणूक प्रचार करताना दिसल्यास उमेदवारावर कारवाई; निवडणुक आयोगाची नियमावली जारी 

अजित पवार यांनी बारामती येथे केलेल्या भाषणाचा आ. आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. शरद पवार हे कुणाचे ऐकत नाहीत. ते सर्व निर्णय एकट्यानेच घेतात, असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रतिज्ञापत्रावर ज्या तटकरेंनी पहिली सही केली आहे, त्यांनाच शरद पवार यांनी दोन वेळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले होते. मंत्रीपदही दिले होते. त्यांच्या मुलीला आमदारकी आणि मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले होते. एवढे सगळे घेऊनही सुनील तटकरे हे शरद पवार यांना हुकूमशहा कसे काय म्हणू शकतात? अजित पवार नेहमीच म्हणत असतात की, ते खोटे बोलत नाहीत. मग त्यांनी खरे सांगावे की, त्यांना कोणी घडवले ? त्यांचे स्वतःचे योगदान काय आहे? असा सवालही आ. आव्हाड यांनी उपस्थित केला.

आता खैर नाही! पेपर फोडणाऱ्यास १० वर्षे तुरुंगवास अन् एक कोटीपर्यंतचा दंड; संसदेत विधेयक सादर 

शरद पवारांवर खोटे आरोप करणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावे की, पवारांच्या घरी सकाळपासूनच जाणारे ते आठजण कोण होते ? जेवढी मोकळीक पवार यांनी दिली होती; तेवढी कोणत्याच पक्षात नाही. हीच मोठी चूक झाली. सर्वांना विश्वासात घेणाऱ्या शरद पवार यांचाच विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आताच नवीन पक्ष नोंदणीसाठी अर्ज करून स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी. तेव्हा निर्णय महाराष्ट्रातील जनताच घेईल, असे आव्हाड म्हणाले.

अपात्रतेबाबत पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, निर्णय काय येणार आहे, हे आम्हास माहीत आहे. पण आम्हाला त्याची भीती नाही. ज्या बापाने आम्हाला घडवले. त्या बापापुढे आमदारकी काय महत्त्वाची? ज्या बापाने आम्हाला घडवले, त्या बापासाठी मरण आले तरी बेहत्तर, असा निर्धार आव्हाड यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!