Just another WordPress site

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, पीएम किसान योजनेचा हप्ताही लांबला, १२ वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान सम्मान निधी योजना हा केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. ज्या अंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष सहा हजाराच्या उत्पन्न समर्थनासाठी पात्र आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ३१ मे रोजी पंतप्रधान मोदींनी किसान योजनेचा ११ वा हप्त्याचे वाटप केले. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पुढील १२व्या हप्त्याची.

 

महत्वाच्या बाबी

१. १२ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही
२. पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता लांबला
३. शेतकरी पाहताहेत १२ हप्त्याची आतुरतेने वाट
४. आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रमतेचे वातावरण आहे

 

महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली. राज्याच्या अनेक भागात पावसाने तुफान फटकेबाजी केली. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबले असून त्याचा विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या अन्य भागांतील शेतकऱ्यांना मोठा बसला. पावसामुळे खरिपाची पिके धोक्‍यात आली. परिणामी यंदा खरीपातील उत्पादन मोठी घट होऊ शकते. अशातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या १२ वा हप्ताही लांबला. शेतकरी १२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
देशभरातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम एका आर्थिक वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये देण्यात येते. अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये मिळतात. आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेचे ११ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले. मात्र, अद्याप १२ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता दिवसेंदिवस लांबत आहे. ग्रामीण भागातील गल्ली बोळात पीएम किसान योजनेतील निधीला घेऊन शेतकरी चिंतेत आहेत. गतवर्षी ९ ऑगस्ट रोजीच २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. त्यामुळे किमान सप्टेंबरमध्ये का होईना ही रक्कम पदरी पडेल अशी आशा होती. मात्र, अद्यापपर्यंत तारिखही जाहीर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या असतांना शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचाच आधार वाटत असल्याने शेतकरी १२ व्या हप्त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहताहेत.
गेल्या ५ वर्षापासून योजनेत सातत्य राहिलेले आहे. मात्र, आता १२ हप्ता मिळाला नसल्याने मोदींकडूनही शेतकऱ्यांची हेळसांड होतेय की, मोदी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या विचारात आहेत, हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!