Just another WordPress site

‘अजित पवार आणि शरद पवार यांच्यात समेट…’; दीपक केसरकरांचे सूचक विधान

Deepak Kesarkar : काही दिवंसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करून शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सहभागी होणारे अजित पवार दोन दिवसांपूर्वी प्रतिभा पवारांच्या भेटीच्या निमित्ताने सिल्वर ओकवर गेले होते. तर काल अख्ख्या अजित पवार (Ajit Pawar) गटानेच शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. वायबी सेंटरवर जाऊन मंत्र्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सोबत काम करण्याची विनंती केली. दरम्यान, अजित पवार गट शरद पवारांना भेटायला गेल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आलं होतं. दरम्यान, आता मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या मनोमिलनाविषयी सूचक विधान केलं. (Reconciliation between Ajit Pawar and Sharad Pawar Indicative statement by Deepak Kesarkar)

आज माध्यमांशी दीपक केसरकर यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात समेट घडावा यासाठी आम्ही प्रार्थना करू. माझीही सुरुवात राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून झाली. काँग्रेसपासून सुरुवात केली आणि नंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मला वाटतं, सर्वांनी शरद पवारांकडे आग्रह धरला तर निश्चितपणे त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ते कदाचित तयार होऊ शकतील. मात्र इतक्या मोठ्या माणसाच्या मनात काय? हे सांगता येत नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला झाला पाहिजे इतकीच आमची इच्छा आहे. मात्र आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करु शकत नाही. ते स्वतः सत्तेवरही होते. त्यांना हे ठाऊक आहे की सत्तेवर असताना जी कामं होतात ती विरोधात असताना होत नाहीत. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घ्यावा एवढी आमची अपेक्षा आहे, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

पक्षात उभी पाडून आणि अजित पवार गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीत ही फुट पडलेली असतांना काल अजित पवार गटाने नाट्यमयरित्या शरद पवारांची भेट घेतली. यामध्ये स्वत: अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश होता. पक्ष एकत्रित राहावा, अशी अजित पवार गटाची भूमिका असल्याचं बोलल्या जातं. त्यामुळं राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या मनोमिलनासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळं थोरले पवार आणि धाकटे पवार एकत्र येणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!