Just another WordPress site

‘अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचं BJP चे आश्वासन;’ पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Prithviraj Chavan : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन पक्षात बंडखोरी केली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन थेट सरकारमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणता मोठी उलथापालथ झाली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं वक्तव्य केलं. भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. (Congress leader Prithviraj Chavan claims BJPs promise to give Chief Minister post to Ajit Pawar)

अजित पवारांच्या भाजप नेत्यांशी गुप्त बैठका सुरू होत्या. याबद्दल मी आधी बोललो आहे. मुख्यमंत्रिपदावर अजित पवार यांचा दावा आहे, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांना विरोध करत आहेत. तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला गेला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, सध्या अजित पवारांकडे दोन तृतीयांश म्हणजे, ३६ किंवा त्याहून अधित आमदार नसावेत. त्यांच्या बंडामागे शरद पवारांची खेळी असेल असे मला वाटत नाही. भाजप राज्यातील महाविकास आघाडीत फूड पाडण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहे. त्यानुसार कॉंग्रेससचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आमचे दोन तृतीयांश म्हणजे, ३० आमदार फुटतील असे आम्हाला वाटत नाही, असं चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेमके संख्याबळ स्पष्ट झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे हा विषय मार्गी लागेल. आणि महाराष्ट्रात भाजप पाच वर्ष सत्तेत राहणे हा सर्वात मोठा धोका होता, म्हणून आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. पुढं बोलतांना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय १० ऑगस्टपूर्वी अपेक्षित आहे. त्यामुळे भविष्यातील तरतुदीसाठी राष्ट्रवादीत फूट पाडण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरल्यास मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन शिंदेंना शांत केले जाईल.

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यामागे असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, शरद पवार यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन अजितदादांचा हा दावा फेटाळून लावला. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होदते. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात अजित पवार आणि शरद पवार आमनेसामने उभे ठाकणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळं आता नेमकं पुढं काय होतं, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!